Homeचिट चॅटयुवा संगम (टप्पा...

युवा संगम (टप्पा २): ऑनलाइन नोंदणी सुरू

युवा संगमची पहिली फेरीचा उत्साही समारोम

भारतातील २२ राज्यांना २९ यात्रांच्या माध्यमातून दिल्या भेटी

युवा संगम (टप्पा २) साठीची नोंदणी आजपासून ऑनलाइन पोर्टलद्वारे सुरू झाली आहे. यात भारतातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १ हजार तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे. या उपक्रमांतर्गत, एक्सपोजर यात्रा एप्रिल आणि मे २०२३ मध्ये आयोजित केल्या जाणार आहे. या माध्यमातून ४५ ते ५० लोकांचा गट दोन राज्यात एकत्र यात्रा करेल. ही यात्रा सहभागी युवकांना पर्यटन, परंपरा, प्रगती, व्यावसायिक (तंत्रज्ञान) आणि परस्पर संपर्क ( लोकांमधील संवाद) या पाच विस्तृत क्षेत्रांतर्गत विविध पैलूंचा एक प्रभावी, बहुआयामी अनुभव देणारा हा प्रवास असणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी भाषा, साहित्य, पाककृती, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यटन या क्षेत्रांतल्या आपल्या अनुभवांबद्दल एकमेकांशी संवाद साधतील. थोडक्यात, त्यांना प्रथमच पूर्णपणे भिन्न भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत जगण्याचा अनुभव याद्वारे ‍मिळणार आहे.

युवा संगमची पहिली फेरी नुकतीच फेब्रुवारी-मार्च २०२३ दरम्यान पार पडली. यात मुख्यतः ईशान्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या पहिल्या टप्प्यात सुमारे १२०० युवकांनी सहभाग नोंदवला होता आणि त्यांनी २९ यात्रांद्वारे भारतातील २२ राज्यांना भेटी दिल्या होत्या. या युवा संगममुळे सहभागी युवकांना खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा एक भारत श्रेष्ठ भारताचा अनुभव मिळाला.

एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत ‘युवा संगम’ या उपक्रमाची संकल्पना विविध मंत्रालयांच्या सहयोगी प्रयत्नांच्या रूपाने साकार झाली, ज्याचा उद्देश लोकांना लोकांशी जोडणे आणि देशभरातील युवकांमध्ये परस्पर सहानुभूती निर्माण करणे हा आहे. उपक्रमाद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार्‍या हजारो तरुणांमध्ये सामंजस्यपणाची भावना जागृत करीत असून तिचा प्रसार देशभरात होण्यासाठी खर्‍या अर्थाने श्रेष्ठ भारत निर्माण करण्यात मोठे योगदान देईल. १८-३० वयोगटातील इच्छुक युवक या उपक्रमात सहभागी होण्यासाठी https://ebsb.aicte-india.org/ या पोर्टलवर आपल्या नावाची नोंदणी करता येईल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content