Homeएनसर्कलभारतीय लष्कराकडून ऑनलाईन...

भारतीय लष्कराकडून ऑनलाईन भरतीप्रक्रिया सुरू

भारतीय लष्कराने 13 फेब्रुवारी 24 ते 22 मार्च 24 या कालावधीत अग्निवीर आणि नियमित केडरच्या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील आणि दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in  या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात.

संकेतस्थळाच्या JCO/OR/Agniveer नावनोंदणी विभागात हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्हिडिओसह पात्रता, नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे. अर्जदारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वापरकर्ता अनुकूल चॅटबॉटदेखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षेदरम्यान खेळाडू, एनसीसी प्रमाणपत्रधारक, आयटीआय आणि पदविकाधारकांना अतिरिक्त गुण दिले जातील. ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षेत ऑफिस असिस्टंट/एसकेटी श्रेणीसाठी प्रथमच टंकलेखन चाचणीदेखील सुरू करण्यात आली आहे.

तरुणांसाठी राष्ट्रीय सुरक्षेसाठी योगदान देण्याची, मौल्यवान कौशल्ये विकसित करण्याची आणि शौर्य आणि अभिमानाचा वारसा असलेल्या प्रतिष्ठित संस्थेचा भाग होण्याची ही सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात दलाल आणि फसवणूक करणाऱ्यांना बळी न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही शंका आणि स्पष्टीकरणासाठी, अर्जदार जवळच्या सैन्य भरती कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content