Homeएनसर्कलकांदा होणार आणखी...

कांदा होणार आणखी स्वस्त! निर्यातशुल्क हटवले!!

महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत या महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किंमती घसरल्या आहेत. कांदा स्वस्त झाला आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याचा भाव अनुक्रमे 1330 आणि 1325 रुपये प्रति क्विंटल होता. कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी कांद्याचे रब्बी उत्पादन 227 लाख मेट्रिक टन (एलएमटी) झाले आहे, जे गेल्या वर्षीच्या 192 लाख मॅट्रिक टनापेक्षा 18% अधिक आहे. भारतातील एकूण कांद्याच्या उत्पादनाच्या 70-75% वाटा असलेला रब्बी कांदा ऑक्टोबर/नोव्हेंबरपासून खरीप पिकाच्या आगमनापर्यंत एकूण उपलब्धता आणि किंमतींमध्ये स्थिरता राखण्यासाठी महत्त्वाचा आहे. या हंगामात अंदाजापेक्षा जास्त उत्पादन झाल्यामुळे येत्या काही महिन्यांत बाजारभाव आणखी कमी होतील अशी अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरचे 20% निर्यात शुल्क येत्या 1 एप्रिलपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार विभागासोबतच्या सल्लामसलतीनंतर महसूल विभागाने काल यासंबंधीची अधिसूचना जारी केली. 13 सप्टेंबर 2024पासून हे निर्यातशुल्क लागू करण्यात आले होते. देशांतर्गत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आणि निर्यात नियंत्रित

करण्यासाठी सरकारने या निर्यातशुल्काची आकारणी, किमान निर्यात किंमत (MEP) आणि 8 डिसेंबर 2023 ते 3 मे 2024 या सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीत निर्यातबंदी सारख्या उपाययोजना केल्या. निर्यातनिर्बंध असूनही, आर्थिक वर्ष 2023-24मध्ये कांद्याची 17.17 लाख मेट्रिक टन आणि आर्थिक वर्ष 2024-25 (18 मार्चपर्यंत)मध्ये 11.65 लाख मेट्रिक टन इतकी निर्यात झाली. सप्टेंबर 2024मध्ये कांद्याच्या मासिक निर्यातीचे प्रमाण 0.72 लाख मेट्रिक टन होते, जे जानेवारी 2025मध्ये 1.85 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढले आहे.

रब्बी पिकांची अपेक्षित आवक वाढल्याने बाजारपेठेतील घाऊक आणि किरकोळ किंमती कमी झाल्या आहेत. या टप्प्यावर, ग्राहकांना परवडेल अशी कांद्याची किमत राखून शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळवून देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. सध्या कांद्याच्या बाजारपेठेतील किंमती मागील वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत जास्त असल्या तरी, देशस्तरावर सरासरी किमतींमध्ये 39%ची घट दिसून आली आहे. गेल्या एका महिन्यात देशस्तरावर कांद्याच्या सरासरी किरकोळ किमतींमध्ये 10%ची घट झाली आहे.

Continue reading

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...
Skip to content