Homeडेली पल्सएक रुपयात पीक...

एक रुपयात पीक विम्याला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पीक

सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थींची सामूहिक सुविधा (CSC) केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने पत्रव्यवहार करण्यात आला होता. याबाबत मुंडे स्वतः  पाठपुरावा करत होते. त्यानंतर काल सायंकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली. दरम्यान, या पीक विमा याजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content