Homeएनसर्कलशिवजयंतीनिमित्त भारतीय जवानांनी...

शिवजयंतीनिमित्त भारतीय जवानांनी केले कोंढाणा सर केल्याचे स्मरण

बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने मराठा दिनी म्हणजेच, 4 फेब्रुवारी 2024 रोजी एका सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या मोहिमेत सहभागी झालेले जवान 800 किलोमीटर अंतर कापून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व प्रमुख किल्ल्यांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आधी पुण्‍यातील सिंहगडावर पोहोचले. या सायकलिंग मोहिमेचे नेतृत्त्व मराठा एलआय रेजिमेंटल सेंटरचे मेजर संदीप कुमार यांच्यासह दोन अधिकाऱ्यांनी केले. यामध्‍ये 13 जवान आणि दोन माजी सैनिकांचा  सहभाग झाले होता. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

4 फेब्रुवारी 2024 हा दिवस भारतीय लष्कराच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटद्वारे मराठा दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा (आताचा सिंहगड) किल्ला याच दिवशी (4 फेब्रुवारी) ताब्यात  घेतला होता. इतिहासामध्‍ये कोंढाण्याची लढाई अनेक दृष्‍टीने अनोखी मानली जाते. या लढाईविषयी युद्धाचे प्रमुख धडे सामरिक ते रणनीती स्तरावर अभ्‍यासले जातात आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचे तेज, प्रेरणा आणि शौर्य यावर प्रकाश टाकणारी ही लढाई मानली जाते.

कोंढणा किल्‍ला सर करण्‍याच्या घटनेप्रीत्यर्थ काढण्‍यात आलेल्या सायकल यात्रा 17 फेब्रुवारी 2024 रोजी सिंहगडावर पोहोचली. यावेळी सायकल यात्रेतील जवानांनी ध्वजवंदन केले आणि तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस  श्रद्धांजली अर्पण केली. कोंढाण्यातील यशस्वी लढाईच्या स्मरण कार्यक्रमामध्‍ये तानाजी मालुसरे यांचे शौर्य, या लढाईतील योगदान, कर्तृत्व आणि बलिदान यांचे स्मरण केले. त्यांच्या कार्याचे स्मरण करणे तसेच त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी अशा मोहिमा शक्तिशाली मार्ग आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमामध्‍ये सेवानिवृत्त नौदल अधिकारी श्रीकांत केसनूर, विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) यांची सिंहगडाची लढाई आणि तानाजी मालुसरे यांचा पराक्रम या विषयावर भाषणे झाली आणि लेफ्टनंट जनरल पीजेएस पन्नू (निवृत्त) यांनी मराठ्यांचा हा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाची सांगता पारंपरिक मराठा पद्धतीच्या भोजनाने झाली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content