Homeचिट चॅटराणीच्या बागेत आता...

राणीच्या बागेत आता घडणार मगर आणि सुसरींचेही दर्शन!

शाळांना सुट्या असल्याने सध्या दैनंदिन पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात म्हणजेच भायखळ्याच्या राणीच्या बागेत दररोज हजारो पर्यटक भेट देत आहेत. उन्हाळी सुट्या असल्याने संग्रहालयात बच्चे कंपनीही आपल्या पालकांसह मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पर्यटक आणि मुलांसाठी उद्यानातील ‘क्रॉक ट्रेल’ (मगर आणि सुसरींसाठीचे मोठे तळे) पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात येण्याऱ्या पर्यटकांना मगर आणि सुसर पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उदयान आणि प्राणिसंग्रहालयात पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून नवनवीन प्राण्यांचा समावेश झाल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच आता जलचर आणि उभयचर प्राण्यांचेही दर्शन पर्यटकांना होत आहे. उन्हाळ्यात मुंबई, महाराष्ट्रासह इतर राज्यातून तसेच परदेशातील पर्यटकही भेट देत आहेत.

सध्या उद्यानात वाघ, बिबट्या, पेंग्विन, अस्वल हे प्राणीदेखील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत. त्यातच रविवार, ७ मे २०२३पासून उद्यानातील ‘क्रॉक ट्रेल’मध्ये तीन मगर आणि दोन सुसरी सोडण्यात आले आहेत. प्रशासनाने या तळ्यात मगरींसाठी आणि सुसरींसाठी दोन वेगवेगळे भाग तयार केले आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाचवेळी दोन्ही प्राणी पाहण्याचा आनंद घेता येत आहे. तसेच पाण्यात पहुडलेल्या मगरी आणि सुसरी पर्यटक तळयाकाठी बनविलेल्या ‘डेक’वरूनही पाहू शकतात. या प्राण्यांच्या पाण्याखालील हालचालीदेखील पर्यटक टीपू शकतात.

पाणपक्ष्यांचा पिंजरा ठरतोय आकर्षण

याच प्राणिसंग्रहालयात आणखी एक खास आकर्षण म्हणजे पाणपक्ष्यांसाठीचा पिंजरा. या पिंजऱ्यात पर्यटकांना स्वत: आत जाता येते. पिंजऱ्यात गेल्यावर आपल्या चोहीबाजूला पक्षी नजरेस पडतात. त्यामुळे आपण पक्ष्यांच्याच घरट्यात शिरल्याची अनुभूती पर्यटक घेत आहेत.

अंडर वॉटर व डेक व्ह्युविंग गॅलरी

प्राणी संग्रहालयात वाघांसाठी तयार केलेल्या काचेच्या ‘व्ह्युविंग गॅलरी’प्रमाणे दर्शनी भाग बनवण्यात आला आहे. मगरींसाठी १५०० स्क्वेअर मीटर जागा अंदाजित करून ही गॅलरी बनवण्यात आली आहे. यामध्ये जाऊन पर्यटक ‘अंडर वॉटर’ आणि ‘डेक व्ह्युविंग’ पद्धतीने मगरी, सुसरी पाहण्याचा आनंद घेत आहेत. सध्या या ठिकाणी असणाऱ्या मगरी, सुसरींना विविध प्रकारचे मांसाहारी खाद्य देण्यात येत आहे.

पर्यटकांचा राबता

शनिवार, रविवारी राणीच्या बागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळत आहे. आठवड्याच्या अखेरीस शनिवारी आणि रविवारी तब्बल ३३ ते ३५ हजार पर्यटक उद्यानात येतात. तसेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज २० ते २२ हजार पर्यटक हमखास येतात.

गांडूळ खतही उपलब्ध

उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाकडून मुख्य तिकीट खिडकीवर गांडूळ खत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे खत उद्यानातच तयार केले आहे. त्यामुळे पर्यटकांना परस बाग, टेरेस गार्डनमधील रोपांसाठी हे खत उपयोगी पडू शकते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content