Homeचिट चॅटआता काँग्रेसमध्ये परस्परांवरही...

आता काँग्रेसमध्ये परस्परांवरही कुरघोडी!

राज्यातल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांची परस्परांवर कुरघोडी चालू असतानाच काँग्रेसमधले दोन नेते आज एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून आले.

चंद्रपूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला. या दाव्यासह हे समर्थक काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे गेले. नागपूरला त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील केदारही सहभागी झाले.

त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवले आणि बोलण्यात संयम राखला तर महाविकास आघाडी अधिक चांगल्या पद्धतीने एकसंघ राहील. आज भाजपासह कोणत्याही पक्षाला स्वतंत्रपणे निवडणुका जिंकता येणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी ही आमची गरज आहे हे ओळखून प्रत्येकाने आपल्या जिभेवर संयम पाळला पाहिजे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, यावर बंद खोलीत चर्चा करता येईल. वडेट्टीवार इतके मोठे नेते नाहीत की त्यांच्यावर मी भाष्य करायला पाहिजे…

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content