Homeकल्चर +आता आर्या आंबेकर...

आता आर्या आंबेकर आणि मामे खानना ऐका मुंबईत!

अमेरिकेसह जगभर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केल्यानंतर हर्षद पराशरेंची पॅराशेअर एन्टरटेन्मेट्स, ही कंपनी आता तीन मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.  जगभारात ३५०पेक्षा अधिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केल्यानंतर पॅराशेअर एन्टरटेन्मेट्स भारतीय रसिकांसाठी सांगितीक मेजवानी घेऊन येत आहे. त्यामुळे रसिकांना आता मुंबईतच आर्या आंबेकर तसेच मामे खान यांना लाईव्ह ऐकणं शक्य होणार आहे.

राजस्थानी गायकीचा ढंग देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे गायक कोक स्टुडिओ फेम मामे खान, आपल्या सतार वादनातून श्रोत्यांच्या काळजाची तार छेडणारे पुरबियान चॅटर्जी आणि आपल्या सुगम आणि शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका आर्या आंबेकर यांच्या कार्यक्रमासह पॅराशेअर एन्टरटेन्मेंट महाराष्ट्रातल्या रसिकांसाठी पर्वणी घेऊन येतेय.

आपल्या आवाजातील गोडव्याने रसिकांच्या मनात अढळस्थान प्राप्त केलेल्या आर्या आंबेकरचे ५ मे रोजी मुंबईत मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात तर २२ मे रोजी बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे रंगमंदिर येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये कधीही न अनुभवलेलं असं आर्याचं पूर्णतः वेगळं सादरीकरण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ११ मे रोजी मुंबईच्या राॅयल ओपेरा हाऊसमध्ये मामे खान आणि पंडित पुरबियान चॅटर्जी यांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. ११ मेच्या संध्याकाळी राजस्थानी ठेका आणि बंगाली गोडवा यांचं फ्यूजन संगीत रसिकांसाठी पर्वणी ठरेल.

या तिन्ही कार्यक्रमांचे दिग्दर्शन पॅराशेअर एन्टरटेन्मेट्सचे संस्थापक हर्षद पराशरे यांनी केले आहे. त्यांचा मराठी रंगभूमीचा अनुभव आणि दिग्दर्शनाची अनोखी शैली यामुळे या कार्यक्रमांची रंगत आणखीनच वाढणार आहे.

भारतामध्ये भारतीय कलाकारांसोबत पदार्पण करताना आमच्या मनात आनंद आणि समाधान आहे. आजवर आम्ही भारतीय कलाकारांना जगभरातलं व्यासपीठ उपलब्ध करुन देत होतो. पण आता भारतातल्या दर्दी रसिकांसाठी आम्ही कार्यक्रम आयोजित करणार आहोत. आम्ही भारतात कार्यक्रम करावेत यासाठी गेली पाच वर्षं आम्हाला आग्रह केला जात होता आणि रसिक मायबापांची ही इच्छा अखेर आम्ही पूर्ण करत आहोत. भारताने अनेक दिग्गज कलाकार या जगाला दिले. तो वारसा जपणं, पुढे नेणं ही आमची जबाबदारी आहे. जगभरातल्या रसिकांसाठी कार्यक्रम केल्यानंतर आता भारतीयांसाठी जागतिक पातळीचे कार्यक्रम करताना आम्हाला फार आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया हर्षद पराशरे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमांची तिकिटं बुक माय शो आणि कार्यक्रमाच्या स्थळी उपलब्ध असतील.

अधिक माहितीसाठी संपर्क- https://parashare.com/

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content