Friday, November 22, 2024
Homeडेली पल्सआता स्टीलच्या भांड्यांसाठी...

आता स्टीलच्या भांड्यांसाठी आयएसआय मार्क अनिवार्य!

केंद्र सरकारने स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) निकषांचे पालन करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. स्वयंपाकघरातील सुरक्षितता, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकारने हे पाऊल आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडद्वारे (डीपीआयआयटी) 14 मार्च 2024 रोजी जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशानुसार अशा भांड्यांसाठी आता आयएसआय मार्क (चिन्ह) अनिवार्य असेल. या नियमांचे पालन न करणे दंडनीय आहे.

स्टेनलेस स्टीलची भांडी: टिकाऊ आणि आकर्षक

बीएसआयने भारतीय मानक IS 14756:2022 मध्ये या गुणधर्मांचे कोडिफिकेशन केले आहे. त्यात स्वयंपाक, खानपान सेवा, डायनिंग आणि स्टोरेजमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या भांड्यांसाठी असलेल्या आवश्यक मानकांचा समावेश आहे.

• साहित्य आवश्यकता: उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची सुरक्षित रचना.

• आकार आणि परिमाणे: भांड्यांच्या डिझाइनमध्ये एकसमानता असावी. व्यावहारिक दृष्टीकोन असावा.

• भांड्यांची कलाकुसर आणि भांड्यांवर शेवटचा हात फिरवणे: उच्च-गुणवत्तेची कारागिरी करून  भांड्यांना आकर्षक करणे.

• वापरण्यापूर्वीच्या चाचण्या:

• स्टेनिंग टेस्ट, मेकॅनिकल शॉक टेस्ट, थर्मल शॉक टेस्ट, ड्राय हीट टेस्ट, कोटिंग जाडी टेस्ट, क्षमता टेस्ट, फ्लेम स्टॅबिलिटी टेस्ट आणि टेम्पर्ड ग्लास लिड्स असलेल्या भांडीसाठी विशिष्ट चाचण्या.

 ॲल्युमिनियमची भांडी: हलकी आणि कार्यक्षम

बीएसआयने भारतीय मानके 1660:2024 विकसित केली आहेत. हार्ड एनोडाइज्ड आणि नॉन-स्टिक अनरिइन्फोर्स्ड प्लास्टिक कोटिंगसह 30 लीटर क्षमतेपर्यंतच्या कास्ट ॲल्युमिनियम भांड्यांसाठी असलेल्या आवश्यक निकषांचे तपशील त्यात आहेत.

या मानकांचे मुख्य घटक:

• सामान्य आवश्यकता: वापरलेल्या सामग्रीची एकूण गुणवत्ता आणि जाडी.

• वर्गीकरण आणि सामग्रीची श्रेणी: तयार केलेल्या भांडीसाठी IS 21 आणि कास्ट भांडीसाठी IS 617नुसार योग्य ग्रेडचा वापर करणे.

• फॅब्रिकेशन आणि डिझाइन: उच्च-गुणवत्तेच्या भांड्यांसाठी आवश्यक आकार, परिमाण आणि कलाकुसरीचे तपशील.

• वापरण्यापूर्वीच्या चाचण्या: टिकाऊपणा आणि सुरक्षिततेच्या हमीसाठी ॲल्युमिनियम लंच बॉक्सच्या विशिष्ट चाचण्यांचा समावेश आहे.

14 मार्च 2024च्या गुणवत्ता नियंत्रण आदेशानुसार स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांप्रमाणेच ॲल्युमिनियमची भांड्यांनाही आयएसआय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. बीएसआय मानकांची पूर्तता न करणारी कोणतीही व्यक्ती भांड्यांचे उत्पादन, आयात, विक्री, वितरण, साठवणूक करू शकत नाही तसेच भांडी भाड्याने देऊ शकत नाही किंवा ती प्रदर्शनात ठेवू शकत नाही. या आदेशाचे उल्लंघन करणे हा दंडनीय अपराध आहे. सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि किचनवेअर उत्पादनांच्या दर्जाविषयीच्या हमीसाठी मानकांचे पालन करणे आवश्यक आहे.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content