Homeचिट चॅटआता भारत घेणार...

आता भारत घेणार 10 सेकंदात स्फोटकांचा शोध!

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज नॅनोस्निफ टेक्नोलॉजीज, या आयआयटी बॉम्बे इनक्युबेटेड स्टार्टअपद्वारा विकसित नॅनो स्निफर, या जगातील पहिल्या  मायक्रोसेन्सर आधारित एक्सप्लोसिव ट्रेस डिटेक्टरचा (ईटीडी) शुभारंभ केला.

नॅनो-स्निफर अतिशय सूक्ष्म स्फोटकांचा शोध घेते आणि काही सेकंदात त्याचे निष्कर्ष देते. ते अचूकपणे सैन्य, व्यावसायिक आणि घरगुती स्फोटकांचा धोका शोधू शकते. अल्गोरिदमचे आणखी विश्लेषण केल्यामुळे स्फोटकांचे योग्य श्रेणीत वर्गीकरण करण्यासदेखील त्याची मदत होते. एमईएमएस सेन्सरसह, स्थानिक निर्मितीतून यामुळे देशाची आयात खर्चाची खूप बचत होईल.

नॅनोस्निफरने पुण्यातल्या डीआरडीओच्या उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेची  (एचईएमआरएल) चाचणी यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे आणि देशातील दहशतवाद प्रतिबंधक दल अर्थात राष्ट्रीय सुरक्षा दलाने (एनएसजी)देखील त्याची चाचणी घेतली आहे.

वेहांत टेक्नॉलॉजीज, या आयआयटी दिल्लीच्या क्रिटिकल सोल्यूशन्स इनक्युबेटेड स्टार्टअपने  नॅनोस्निफरचे विपणन केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता/मशीन लर्निंग-आधारित शारीरिक सुरक्षा, देखरेख आणि वाहतूक निरीक्षण आणि जंक्शन अंमलबजावणी सोल्यूशन्समध्ये अग्रणी असलेल्या वेहांत टेक्नॉलॉजीबरोबर नॅनोस्निफ टेक्नॉलॉजीजने भागीदारी केली आहे. आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही. रामगोपाल राव यावेळी उपस्थित होते.

नॅनोस्निफर हे संशोधन, विकास आणि उत्पादन या बाबतीत 100% मेड इन इंडिया उत्पादन आहे. नॅनोस्निफरचे मूळ तंत्रज्ञान अमेरिका आणि युरोपमधील पेटंटद्वारे सुरक्षित आहे. हे किफायतशीर उपकरण आयात एक्सप्लोसिव्ह ट्रेस डिटेक्टर उपकरणांवरचे आपले अवलंबत्व  कमी करेल. हे इतर संस्था, स्टार्टअप्स आणि मध्यम-उद्योगांना स्वदेशी उत्पादनांचे संशोधन आणि विकास करण्यास प्रोत्साहित करेल. लॅब टू मार्केट उत्पादनाचे हे परिपूर्ण उदाहरण आहे.

एक्सप्लोसिव्ह ट्रेस डिटेक्टर डिव्हाइस (ईटीडी) – नॅनोस्निफर हे 10 सेकंदांपेक्षा कमी कालावधीत स्फोटके शोधू शकते आणि स्फोटकांचे वेगवेगळ्या श्रेणीत वर्गीकरण करू शकते. ते सैन्य, पारंपारिक आणि घरगुती स्फोटकांच्या सर्व श्रेणीचा शोध घेते. नॅनोस्निफर सूर्यप्रकाशात वाचता येईल अशा कलर डिस्प्लेसह दृश्य आणि ऐकू येतील असे इशारे देतो.

या उत्पादनाच्या विकासासह आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी दिल्ली आणि त्यांच्या अन्य कंपन्या प्रगत व परवडणार्‍या स्वदेशी उत्पादनांसह देशाच्या सुरक्षेला चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. हे शैक्षणिक आणि उद्योग सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे, जे भारतातील इतर स्टार्टअप्ससमोर एक उदाहरण ठरेल. आपला देश प्रतिभावान, ज्ञानी आणि कष्टकरी उद्योजकांनी परिपूर्ण असताना आपण परदेशी उत्पादने का आयात करावी? आता आपला देश नॅनोस्निफर, स्फोटक ट्रेस डिटेक्टरसारख्या उत्पादनांचा विकास आणि उत्पादन करत आहे.

भौगोलिक-राजकीय स्थितीमुळे आपल्या देशाला सातत्याने धोका उद्भवत असून  विमानतळ, रेल्वे आणि मेट्रो स्थानके, हॉटेल, मॉल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणासारख्या उच्च सुरक्षेच्या ठिकाणी स्फोटके आणि प्रतिबंधात्मक तपासणी हा एक नियम बनला आहे. अशा ठिकाणांवर लोक तसेच सामानाच्या तपासणीसाठी वेगवान स्कॅनिंगसाठी प्रगत शोध उपकरणे वापरली जात आहेत. स्फोटक शोधण्यासाठी जवळपास ही सर्व उत्पादने मोठी किंमत मोजून  आयात केली जातात ज्यामुळे देशाला मौल्यवान परकीय चलन गमवावे लागते. अशा उत्पादनांसाठी नॅनोस्निफर एक योग्य पर्याय आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content