Friday, October 18, 2024
Homeएनसर्कलआता हरित वाहतूक...

आता हरित वाहतूक होणार अधिक गतीमान!

इकोफाय ही भारतातील ग्रीन-ओन्‍ली नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) आणि विद्युत हा इलेक्ट्रिक तीन-चाकीचे संपादन अधिक किफायतशीर करण्‍यामध्‍ये विशेषीकृत असलेला अग्रगण्‍य ईव्‍ही मालकीहक्‍क प्लॅटफॉर्म यांनी धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा नुकतीच केली. या सहयोगाचा इलेक्ट्रिक वेईकल बाजारपेठेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याचा आणि शाश्‍वत परिवहन सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍याचा मानस आहे. इकोफाय कर्जासाठी आर्थिक साह्य करेल, तर विद्युत किफायतशीर ईव्‍ही सोल्‍यूशन्‍सच्‍या खात्रीसाठी सबस्क्रिप्‍शन-आधारित बॅटरी-अॅज-ए-सर्विस मॉडेल प्रदान करेल. त्यामुळे हरित वाहतूक अधिक गतीमान होईल.

हा सहयोग ईव्‍ही मालकीहक्‍क समकालीन आयसीई वाहनांप्रमाणे सुलभ व विनासायास करण्‍याच्‍या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. संपादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करणाऱ्या, तसेच पे-पर-किलोमीटर बॅटरी लीजिंग मॉडेल सादर करणाऱ्या हायब्रिड फायनान्सिंग मॉडेलसह इकोफाय आणि विद्युतचा ईव्‍हीचे अवलंबन विनासायास व जोखीममुक्‍त करण्‍याचा प्रयत्न आहे.

इकोफाय येथील पार्टनरशीप्‍स अँड को-लेंडिंगचे प्रमुख कैलाश राठी म्‍हणाले की, या सहयोगामधून शाश्‍वत गतीशीलता सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍याप्रती आमची संयुक्‍त कटिबद्धता दिसून येते. इकोफायने आपल्‍या अद्वितीय उत्‍पादनासह तीनचाकी ईव्‍ही क्षेत्रात अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणले आहे आणि सर्व अव्‍वल ओईएमसोबत सहयोग केला आहे. समर्पित हरित फायनान्शियर म्‍हणून आम्‍ही देशामध्‍ये हरित परिवर्तनाला गती देण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण व सर्वोत्तम सोल्‍यूशन्‍स सादर करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहोत. या बाबीशी बांधील राहत तसेच इकोफायचे हरित फायनान्सिंगमधील कौशल्‍य आणि विद्युतचे सबस्क्रिप्‍शन मॉडेल एकत्र करत आमचा देशातील ईव्‍ही मालकीहक्‍काचे लोकशाहीकरण करण्‍याचा प्रयत्न आहे. आमचे बॅटरी सबस्क्रिप्‍शन-आधारित वेईकल ओनरशीप मॉडेल ग्राहकांना पारंपारिक आयसीई वेईकल मालकीहक्‍कासाठी ३० ते ४० टक्‍के स्‍वस्‍त पर्याय देते.

विद्युतचे सह-संस्‍थापक क्षितिज कोठी म्‍हणाले की, आम्‍हाला इलेक्ट्रिक वाहनांच्‍या अवलंबतेला गती देण्‍यासाठी आणि हरित भविष्‍याप्रती योगदान देण्‍यासाठी इकोफायसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. आमचे सबस्क्रिप्‍शन-आधारित सर्वांगीण ओनरशीप मॉडेल शाश्‍वत फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून पर्यावरणावर सकारात्‍मक प्रभाव निर्माण करण्‍याप्रती इकोफायच्‍या मिशनशी परिपूर्ण संलग्‍न आहे. सहयोगाने, आमचा स्‍वावलंबी उद्योजक व लघु व्‍यवसायांना विनासायास इलेक्ट्रिक वेईकल्‍सप्रती परिवर्तन घडवून आणण्‍यास सक्षम करण्‍याचा इरादा आहे. 

Continue reading

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान! 23ला निकाल!!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याचकरीता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या...
Skip to content