Homeचिट चॅटआता शिवछत्रपती क्रीडा...

आता शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी करा २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज

राज्याच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यासाठी २० फेब्रुवारी २०२३पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या क्रीडा महर्षींचा गौरव करण्यासाठी शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. संचालनालयाने अर्ज करण्यासाठी पूर्वी ३० जानेवारीपर्यंत मुदत दिलेली होती. तथापि, विविध क्रीडा संघटना, खेळांडूंच्या विनंतीनुसार आता २० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून २० फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेपर्यंत पुरस्कारासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत.

साहसी क्रीडा पुरस्कारासह सर्व क्रीडा पुरस्कारांसाठी कामगिरीचा कालावधी त्या पुरस्कार वर्षातील ३० जून रोजी संपण्याऱ्या वर्षासह विचारात घेण्यात येईल. पुरस्कारासाठी अर्जाचे नमुन्यासाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्या. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content