Friday, November 22, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटमुख्यमंत्री शिंदेंचे फेसबुक...

मुख्यमंत्री शिंदेंचे फेसबुक नव्हे तर फेस टू फेस काम!

महायुती सरकारच्या २५ महिन्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल २२ हजार ३६४ फाईल्सचा निपटारा केला आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या तुलनेत दुप्पट फाईल्सचा निपटारा आणि तिप्पट कामांना मंजुरी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक नव्हे तर फेस टू फेस काम करणारे सरकार असल्याचे दाखवून दिले आहे.

१ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२४ या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा दुप्पट वेगाने फाईलींचा निपटारा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी २५ महिन्यांत तिप्पट कामांना मंजुरी दिली. राज्यातील विकासकामांचे प्रस्ताव आणि जनहिताच्या फाईल्सचा वेगाने पाठपुरवठा करून

मुख्यमंत्री

मुख्यमंत्री कार्यालयाने त्या मंजूर केल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे केवळ अडीच दिवस मंत्रालयात गेले होते. उर्वरित काळात फेसबुकवर काम करुन त्यांनी राज्याचा प्रगतीला हातभार लावला.

उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या २५ महिन्यांत मुख्यमंत्री कार्यालयाकडे २३ हजार ६७४ फाईल्स प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २२ हजार ३६४ फाईल्सना मंजुरी देण्यात आली. राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाची ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे. १ जानेवारी २०२० ते २० मे २०२२ या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे ११ हजार २२७ फाईल्स प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी केवळ ६ हजार ८२४ फाईल्स मंजूर करण्यात आल्या होत्या.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content