Homeबॅक पेज10वी, 12वी परीक्षांसाठी...

10वी, 12वी परीक्षांसाठी NIOSचे परीक्षा सूचनापत्रक जारी!

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगतर्फे त्यांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा (NIOS), वर्षातून दोनदा एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात पूर्व निश्चित केलेल्या तारखांना, आयोजित केल्या जातात.

ऑक्टोबर-नोव्हेंबर, 2023 या वर्षीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमांसाठी एनआयओएसच्या प्रात्यक्षिक परीक्षा 16 सप्टेंबर  2023 ते 01 ऑक्टोबर, 2023 आणि लेखी परीक्षा 03 ऑक्टोबर, 2023 ते 08 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत विविध ठिकाणच्या अभ्यास केंद्रांवर/परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.

परीक्षेच्या तारखा, वेळापत्रक आणि इतर तपशील एनआयओएसच्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत http://sdmis.nios.ac.in प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेसाठी ओळखपत्र परीक्षा सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर उपलब्ध करून दिली जातील, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content