Sunday, September 8, 2024
Homeचिट चॅटनवीन किया सोनेट...

नवीन किया सोनेट ७.९९ लाख रुपयांमध्ये लॉन्च!

किया, या भारताच्या आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने आपली सर्वात प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्ही – नवीन सोनेट ७.९९ लाख रुपये  (एक्स-शोरूम) या आकर्षक प्राथमिक किंमतीपासून देशभरात दाखल केली आहे. डिसेंबर 2023मध्ये अनावरण करण्यात आलेल्या कियाच्या या दुसऱ्या क्रमांकाच्या बेस्ट-सेलिंग नवीनतम पुनरावृत्तीमध्ये २५ सुरक्षा फीचर्स आहेत, ज्यामध्ये १० स्वायत्त फीचर्स असलेले अप्रतिम एडीएएस आणि १५ मजबूत उच्चसुरक्षा फीचर्स समाविष्ट आहेत.

या गाडीत ‘फाइंड माय कार विथ एसव्हीएम’सहित ७०पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स आहेत. हे फीचर कारच्या सभोवतालचा व्ह्यू आणि हिंग्लिश आदेश देते, ज्यामुळे सोनेट चालवण्यास सर्वात आरामदायक ठरते. १९ वेगवेगळ्या व्हेरीयन्टमधल्या उपलब्धतेसह, नवीन सोनेट ड्रायव्हिंग अनुभवाची वैविध्यपूर्ण श्रेणी ऑफर करते. यात ५ डिझेल मॅन्युअल व्हेरीयन्ट ९.७९ लाख रु.पासून सुरू होतात. डिझेल आणि पेट्रोल इंजिनच्या सर्वात वरच्या क्रमांकाच्या व्हेरीयन्टमध्ये १० स्वायत्त फंक्शन्स असलेली या सेगमेन्टमधली सर्वोत्तम एडीएएस लेव्हल १ आहे. जीटी लाइन आणि एक्स-लाइन व्हेरीयन्टची किंमत पेट्रोलमध्ये अनुक्रमे १४.५० लाख रु. आणि १४.६९ लाख रु. आहे, तर डिझेलमध्ये १५.५० लाख आणि १५.६९ लाख रु. आहे. ग्राहक किया इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवरुन तसेच किया इंडियाच्या अधिकृत डीलरशिपकडे २५००० रु. प्रारंभिक बुकिंग किंमत देऊन नवीन सोनेट बुक करू शकतात.

किया इंडियाचे चीफ सेल्स आणि बिझनेस स्ट्रॅटजी अधिकारी म्युंग-सिक सोन म्हणाले की, नवीन सोनेट दाखल करून आम्ही पुन्हा कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेन्टला प्रीमियम बनवत आहोत. जुन्या सोनेटने आपल्या असामान्य डिझाईनने आणि तांत्रिक क्षमतेने या सेगमेन्टमध्ये खळबळ माजवली होती. नवीन सोनेटच्या मदतीने आम्ही तो विजयाचा प्रस्ताव आणखी उंच घेऊन जात आहोत. अत्यंत प्रगत एडीएएस तंत्रज्ञानासह कमीत कमी देखभालखर्च आणि टॉप-टियर सुरक्षा प्रस्तावाच्या पाठबळावर आम्ही किंमतीचे लक्षणीय मूल्य देण्याचा प्रयत्न करत आहोत. शिवाय या सेगमेन्टमधली ही सर्वाधिक कनेक्टेड कार आहे. त्यात मजेदार हिंग्लिश कमांड आणि सराऊंड व्ह्यू मॉनिटरसारखी भविष्यवेधी फीचर्स आहेत. ही सर्व संरचना लहान आणि मोठ्या पल्ल्याच्या प्रवासात कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा श्रेष्ठ ड्रायव्हिंग अनुभव देण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे.

ही नवीन सौष्ठवपूर्ण आणि स्पॉर्टीयर सोनेट आपल्या ताठ बॉडी स्टाइलमुळे रस्त्यावर आपली ठळक उपस्थिती नोंदवते. फ्रंट कोलीझन अव्हॉईडन्स असिस्ट, लीडिंग वेहिकल डिपार्चर अलर्ट आणि लेन फॉलोइंग असिस्टसारख्या १० स्वायत्त फीचर्सने सुसज्ज लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीची ही नवीनतम आवृत्ती आधुनिक भारतीय ग्राहकांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आहे. ड्रायव्हिंगचा सुरक्षित अनुभव देणाऱ्या या गाडीच्या सर्व व्हेरीयन्टमध्ये दमदार १५ उच्चसुरक्षा फीचर्स आहेत. ज्यापैकी काही सांगायची झाल्यास- ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि वेहिकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट वगैरे आहेत. सोनेटपासून सुरुवात करत कियाने आता आपल्या संपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ६ एअरबॅग मानक करून टाकल्या आहेत.

सोनेटमध्ये या सेगमेन्टमध्ये सर्वोत्तम अशी १० फीचर्स आहेत, जशी की ड्युअल स्क्रीन कनेक्टेड पॅनल डिझाईन, रियर डोर सनशेड कर्टन आणि सर्व दारांना सुरक्षेसह पॉवर विंडो वन टच ऑटो अप-डाऊन. जवळच्या प्रतिस्पर्धींच्या तुलनेत नवीन सोनेटमध्ये त्यांच्यापेक्षा जास्त असे किमान ११ फायदे आहेत आणि ती तांत्रिकदृष्ट्या सर्वात प्रगत आणि फीचर्सने समृद्ध कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. या नवीन सोनेटमध्ये आता नवीन ग्रिल आणि नवीन बंपर डिझाईन असलेला काहीसा वर आलेला दर्शनी भाग आहे, क्राऊन ज्वेल एलईडी हेडलॅम्प, आर१६ क्रिस्टल कट अलॉय व्हील्स आणि स्टार मॅप एलईडी कनेक्टेड टेल लॅम्प आहेत.

या गाडीच्या पूर्वी येऊन गेलेल्या आवृत्तीप्रमाणेच, नवीन सोनेट कनेक्टेड कार अनुभव देत पुन्हा एक बेंचमार्क स्थापित करत आहे. या गाडीत ७०+ कनेक्टेड कार अनुभव आहेत, जे मालकी आणि ड्रायव्हिंगचा आगळा अनुभव देतील. सराऊंड व्ह्यू मॉनिटरसह फाइंड माय कार, हिंग्लिश व्हीआर कमांड्स, व्हॅलेट मोड आणि रिमोट विंडो कंट्रोलसारखी फीचर्स दाखल केलेली नवी सोनेट ग्राहकांना केवळ सुविधा देत नाही, तर, सुरक्षेचा एक अतिरिक्त थरदेखील सुनिश्चित करते. सोनेटचे हे नवीन रूप आगळा इन-केबिन अनुभव देते. कारण, यामध्ये टेक्नॉलॉजीभिमुख डॅशबोर्ड, एलईडी अॅम्बीयन्ट साऊंड लाइटिंग, २६.०४ सेमी (१०.२५”) कलर एलसीडी एमआयडी आणि २६.०३ सेमी (१०.२५”) एचडी टचस्क्रीन नेव्हीगेशन असलेले ड्युअल स्क्रीन कनेक्टेड पॅनल डिझाईन फुल डिजिटल क्लस्टर, स्टीयरिंग व्हीलवर नवीन जीटी लाइन लोगो आणि इन्टिरियरमध्ये १ नवीन रंगासह ५ रंगांचे पर्याय असे लक्झुरियस इन्टिरियर्स आहेत. ही कार आता ८ मोनोटोन, २ ड्युअल टोन आणि १ मॅट फिनिश कलरसह नवीन प्यूटर ऑलिव्ह बॉडी कलरमध्येदेखील उपलब्ध आहे.

प्राथमिक किंमतीचा तक्ता:

इंजिनट्रान्समिशनट्रिमकिंमत (INR आणि भारतभरात एक्स-शोरूम)
स्मार्टस्ट्रीम5MTHTE7,99,000
HTK8,79,000
HTK+9,89,900
स्मार्टस्ट्रीम G1.0T-GDiiMTHTK+10,49,000
HTX1,149,000
HTX+1,339,000
7DCTHTX1,229,000
GTX+1,449,900
X-लाइन1,469,000
1.5L CRDi VGT6MTHTE979,000
HTK1,039,000
HTK+1,139,000
HTX1,199,000
HTX+1,369,000
6iMTHTX1,259,900
HTX+1,439,000
6AT HTX1,299,000
GTX+1,549,900
 X-लाइन15,69,000

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content