Homeचिट चॅटनौदलाचे कोविडसाठी ऑपरेशन...

नौदलाचे कोविडसाठी ऑपरेशन ‘समुद्र सेतू-2’ सुरू!

कोविड-19 महामारीविरोधात सुरू असलेल्या लढ्यात राष्ट्रीय स्तरावरच्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या हेतूने, भारतीय नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू-2’ सुरू केले आहे. या अंतर्गत, नौदलाच्या तिन्ही विभागातून म्हणजेच मुंबई, विशाखापट्टणम आणि कोची येथून भारताच्या युद्धनौका रवाना झाल्या आहेत. या नौकांमधून विविध मित्र राष्ट्रांकडून समुद्रमार्गे सध्या भारतात अत्यंत आवश्यक असलेले ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साधने आणली जात जात आहेत.

पश्चिम समुद्रमार्गे काल दुपारी भारताची युद्धनौका आयएनएस तलवार बाहरीन इथून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टॅंक घेऊन, भारतात कर्नाटकच्या न्यू मंगलोर पोर्टच्या धक्क्यावर पोहोचली. त्याशिवाय, आयएनएस कोलकाता कुवैतहून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टॅंक घेऊन, 400 ऑक्सिजनयुक्त सिलेंडर्स, 47 काँसंट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय साधने घेऊन भारताकडे रवाना झाल्या आहेत. यासोबतच, आणखी चार युद्धनौका कुवैत तसेच कतार येथून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे टॅंक आणि 1500पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन येणार आहेत.

समुद्र सेतू

पूर्व समुद्रमार्गाने भारताची युद्धनौका आयएनएस ऐरावत सिंगापूरहून 3000पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स, 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे आठ टॅंक (216 टन), 10000 रॅपिड अँटीजेन टेस्ट कीट्स आणि 7 काँसंट्रेटर्स घेऊन भारताकडे रवाना झाली आहे. तसेच आयएनएस जलाश्व ही युद्धनौका सध्या नैऋत्य आशियात तैनात असून, परिस्थितीनुसार गरज भासल्यास, तिलाही त्या प्रदेशातील बंदरावर पाठवले जाऊ शकते.

आयएनएस शार्दूल, ही कोचीच्या तळावरील युद्धनौकादेखील आखाती देशांतून तीन द्रवरूप ऑक्सिजन भरलेले क्रायोजनिक कंटेनर्स घेऊन येत आहे. आयएनएस जलाश्व आणि आयएनएस शार्दूल यांनी गेल्यावर्षीच्या समुद्र सेतू अभियानातदेखील सहभाग घेतला होता.

गेल्या वर्षी नौदलाने जसे समुद्र सेतू अभियान राबवून हिंद महासागर प्रदेशातल्या-IOR देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले होते, तशाच प्रकारे, भारतीय नौदल आजही देशाच्या या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

1 COMMENT

  1. महिती अत्यंत उपयुक्त आहे…… असेच लिखाण व्हावे….

Comments are closed.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content