Homeमुंबई स्पेशलराणीच्या बागेतल्या पुष्पोत्सवात...

राणीच्या बागेतल्या पुष्पोत्सवात यंदा जपला जाणार राष्ट्राभिमान!

मुंबई महापालिकेतर्फे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात म्हणजेच पूर्वीच्या राणीच्या बागेत येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे. दरवर्षी हा उत्सव एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो. यंदाच्या पुष्पोत्सवात भारतातील राष्ट्रीय प्रतिके पानाफुलांच्या मदतीने साकारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मनोरंजनासह ज्ञानातही भर घालता येणार आहे. याशिवाय आपल्या देशातील राष्ट्रीय प्रतिकांबाबत राष्ट्रभिमानही वाढणार आहे.

पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त (उद्याने) चंदा जाधव, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई पुष्पोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे यंदाचे हे २८वे वर्षे आहे. या पुष्पोत्सवाची खासियत म्हणजे आपल्याला एकाच छताखाली वेगवेगळ्या रंगांची, सुगंधाची फुलझाडे पाहावयास मिळतात. रोपांची लागवड, त्यांची निगा राखणे, त्यांची सजावट करणे आदी गोष्टींवर उद्यान विभागाचे अधिकारी-कर्मचारी कसे काम करतात याचे साक्षीदार होता येते.

आतापर्यंत या पुष्पोत्स्वात कार्टून, आमची मुंबई, संगीत, सेल्फी पॉईंट, डिज्नी लँड, जलजीवन, अॅक्वाटीक वर्ड, अॅनिमल किंग्डम आदी संकल्पनांवर आधारित फुलांची सजावट करण्यात आली आहे. याच धर्तीवर आधारित यंदा भारताची राष्ट्रीय प्रतिके अशी संकल्पना ठरवून पुष्पोत्सवात फुलांची सजावट करण्यात येणार आहे. मुंबई पुष्पोत्सवात विविध प्रजातींची फुलझाडे, फळांची रोपटी, रंगबेरंगी फुलझाडे, औषधी वनस्पती इत्यादी मिळून सुमारे ५ हजार रोपांचा समावेश असेल. भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ, भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा, भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्टीय खेळ हॉकी, राष्ट्रीय जलचर डॉल्फिन, राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष, राष्ट्रीय चलन रुपया, राष्ट्रीय नदी गंगा आदींची प्रतिकृती या पुष्पोत्सवात साकारण्यात येणार आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content