मुंबई महापालिकेचे ‘के पश्चिम’ विभागाच्या अखत्यारितील एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र व दवाखान्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव हे आरोग्य केंद्र व दवाखाना तात्पुरत्या स्वरुपात खालील नमूद नवीन जागी स्थलांतरित करण्यात आला आहे.
स्थलांतराचा पत्ताः
एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र व दवाखाना,
बी. एम. सी. जिमखाना,
गिलबर्ट हिल, सागर सिटी शाळेजवळ,
अंधेरी (पश्चिम), मुंबई.
तरी नागरिकांनी या आरोग्य केंद्र आणि दवाखाना सुविधांचा स्थलांतरीत ठिकाणी लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.