Homeमुंबई स्पेशलमुंबईचे पालिका मुख्यालय...

मुंबईचे पालिका मुख्यालय उजळले युरोपियन संघाच्या ध्वजासारखे

युरोपियन संघाच्या वतीने दरवर्षी ९ मे हा दिवस युरोप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर ९ मे रोजी सायंकाळी युरोपियन संघ ध्वजावर आधारित रंगसंगतीची विद्युत रोषणाई करण्यात आली. याप्रसंगी मुंबईतील युरोपियन संघ सदस्य देशांच्या वाणिज्य दूतावासांमधील प्रतिनिधींनी सदिच्छा भेट दिली तर महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित होते.

युरोपियन संघाच्या ध्वजामध्ये निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगातील १२ तारे (स्टार) वर्तुळाकार मांडणीमध्ये दर्शवलेले आहेत. युरोपियन संघातील सदस्य देशांच्या (२७) एकतेचे प्रतीक म्हणून हे तारे आहेत. यंदा युरोपियन संघाचे अध्यक्षपद बेल्जियम, या देशाकडे आहे. यास्तव, युरोप दिनानिमित्त पालिका मुख्यालयावर युरोप संघ ध्वजाच्या रंगसंगतीची रोषणाई करावी, तसेच विशेष अतिथी या नात्याने यावेळी उपस्थित राहवे, अशी विनंती पालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी यांना बेल्जियमच्या मुंबईतील वाणिज्यिक दूतावासाने केली होती. या विनंतीचा मान राखून, सद्भाव या नात्याने पालिका मुख्यालयावर निळ्या व सोनेरी रंगसंगतीची विद्युत रोशणाई करण्यात आली होती.

याप्रसंगी बेल्जियमचे वाणिज्यदूत फ्रॅंक ग्रीकेन्स, हंगेरीचे वाणिज्यदूत फेरेंक जारी, फिनलँडचे वाणिज्यदूत एरीक अफ हॉलस्ट्रोम, जर्मनीचे वाणिज्यदूत एचिम फॅबिग, फ्रान्सचे वाणिज्यदूत जीन मार्क सेरेचारलेट, स्वीडनचे वाणिज्यदूत एरीक माल्मबर्ग, स्पेनचे वाणिज्यदूत फर्नांडो हेरेडिया, नेदरलँड्सचे वाणिज्यदूत बार्ट डी जोंग, आयर्लंडच्या वाणिज्यदूत अनिता केल्ली, इटलीचे वाणिज्यदूत एलेसऍन्ड्रो डी मॅसी, झेक प्रजासत्ताकच्या वाणिज्यदूत कॅथरीन ओव्हकोव्हा, पोलँडचे वाणिज्यदूत अलेक्झांडर डॅन्डा तसेच या सर्व वाणिज्यदूतांमधील संबंधित अधिकारीदेखील उपस्थित होते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content