देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुंबई महापालिकेचे मुख्यालय सजवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या नेतृत्त्वाखाली उद्यान व खते ए विभाग यांच्यामार्फत मुंबई महापालिकेचे मुख्य कार्यालय शोभिवंत कुंड्या लावून असा सुशोभित करण्यात आला.






