Homeकल्चर +१ ऑगस्टला रूपेरी...

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता ‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत “मुंबई लोकल” या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेनमेंटच्या प्राची अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्र्यंबक डागा सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे. विनोद शिंदे असोसिएट डिरेक्टर आणि कलादिग्दर्शक डॉ. सुमित पाटील आहेत. चित्रपटातील गाणी गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांची असून देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी व हर्षवर्धन वावरे यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आहे. पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणून राहुल ठोंबरे यांनी काम पाहिले आहे.

लोकल रेल्वेचं मुंबईमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबई लोकल, हे अनेकांचं जणू कुटुंब आहे. लोकल प्रवासात संवाद होतात, वाद होतात, मैत्री होते, तसंच प्रेमही फुलतं. लोकल प्रवासात फुललेली अशीच एक अनोखी प्रेमकहाणी या चित्रपटात पाहता येणार आहे. लोकल रेल्वे काही मराठी चित्रपटांतून दाखवली गेली असलीतरी लोकलमध्ये फुलणारी प्रेमकथा पहिल्यांदाच मराठी चित्रपटात दिसणार आहे. टाइमपास, टकाटक, बालक पालक, असे अनेक यशस्वी चित्रपट केलेला प्रथमेश परब, तर सख्या रे, जिंदगी नॉट आऊट, शतदा प्रेम करावे, ठिपक्यांची रांगोळी, अशा मालिका, धुरळासारख्या चित्रपटात चमकलेली ज्ञानदा रामतीर्थकर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content