Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात...

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.४४ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:-

रायगड- ५८.१०, बारामती– ५६.०७, उस्मानाबाद- ६०.९१, लातूर- ६०.१८, सोलापूर– ५७.६१, माढा– ६२.१७, सांगली- ६०.९५, सातारा- ६३.०५, रत्नागिरी-सिंधुदूर्ग- ५९.२३, कोल्हापूर- ७०.३५ आणि हातकणंगले- ६८.०७ टक्के. ही अंदाजी टक्केवारी असून अंतीम टक्केवारी साधारण ३ ते ४ टक्क्यांनी वाढलेली असेल, असे सूत्रांनी सांगितले.

मतदान

सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

काल सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी  ६.६४  टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ७.९१, सांगलीत ५.८१, बारामतीत ५.७७, हातकणंगलेमध्ये ७.५५, कोल्हापूरमध्ये ८.०४, माढात ४.९९, उस्मानाबादेत ५.७९, रायगडमध्ये ६.८४, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये ८.१७, साताऱ्यात ७.०० तर सोलापूरमध्ये ५.९२ टक्के मतदान झाले.

सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात ११ वाजेपर्यंत सरासरी  १८.१८ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये २०.७४, सांगलीत १६.६१, बारामतीत १४.६४, हातकणंगलेमध्ये २०.७४, कोल्हापुरात २३.७७, माढामध्ये १५ .११, उस्मानाबादेत १७.०६, रायगडमध्ये १७.१८, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये २१.१९, साताऱ्यात १८.९४ तर सोलापूरमध्ये १५.६९ टक्के मतदान झाले.

दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ३२.७१, सांगलीत २९.६५, बारामतीत २७.५५, हातकणंगलेत ३६.१७, कोल्हापूरमध्ये ३८.४२, माढामध्ये २६.६१, उस्मानाबादेत ३०.५४, रायगडमध्ये ३१.३४, रत्नागिरी–सिंधुदूर्गमध्ये ३३.९१, साताऱ्यात ३२.७८ तर सोलापूरमध्ये २९.३२ टक्के मतदान झाले.

मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ४४.४८, सांगलीत ४१.३०, बारामतीत ३४.९६, हातकणंगलेत ४९.९४, कोल्हापुरात ५१.५१, माढामध्ये ३९.११, उस्मानाबादमध्ये ४०.९२, रायगडमध्ये ४१.४३, रत्नागिरी–सिंधुदूर्गमध्ये ४४.७३, साताऱ्यात ४३.८३ तर सोलापूरमध्ये ३९.५४ टक्के मतदान झाले.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे. लातूरमध्ये ५५.३८, सांगलीत ५२.५६, बारामतीत ४५.६८, हातकणंगलेमध्ये ६२.१८, कोल्हापुरात ६३.७१, माढामध्ये ५०.००, उस्मानाबादेत ५२.७८, रायगडमध्ये ५०.३१, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये ५३.७५, साताऱ्यात ५४.११ तर सोलापूरमध्ये ४९.१७ टक्के मतदान झाले.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content