Homeबॅक पेजवस्त्रोद्योग मंत्रालयाने केली...

वस्त्रोद्योग मंत्रालयाने केली ‘जागतिक कापूस दिना’ची तयारी!

वस्त्रोद्योग मंत्रालयाने जागतिक कापूस दिन 2023 साजरा करण्यासाठी धोरण, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान अद्ययावतीकरणद्वारे भारतीय कापसाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवणे या संकल्पनेवर केंद्रित परिषदेचे आयोजन केले. हा कार्यक्रम भारतीय कापूस महामंडळ आणि GIZ चा युरोपिअन संघ -संसाधन कार्यक्षमता उपक्रमच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.

जागतिक कापूस दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत, फार्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेन अशा संपूर्ण कापूस मूल्य साखळीमधील सर्वोत्तम पद्धती आणि शाश्वत शेती पद्धती अधोरेखित करण्यात आल्या. विचारमंथन सत्रांमध्ये कापूस मूल्य साखळीमध्ये शाश्वतता आणि चक्रीयतेला चालना देणे आणि गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कापूस मोहीम यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर ऊहापोह झाला.

भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी कापसाची गुणवत्ता, विविधता, मूळ आणि इतर प्रमुख मापदंडांची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय कापूस महामंडळाने ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून बेल आयडेंटिफिकेशन अँड ट्रेसेबिलिटी सिस्टम (BITS) प्रणालीचे उदघाटन केले. प्रत्येक कापसाच्या गाठीवर आता एक क्यूआर कोड आहे ज्याद्वारे टाइमस्टँपसह त्याचा मूळ स्त्रोत, प्रक्रिया करणारा कारखाना, साठवणूक तपशील आणि संबंधित कापसाच्या गुणवत्तेच्या माहितीचा  सहजपणे मागोवा घेता येतो.

त्याचबरोबर, वस्त्रोद्योग मंत्रालयाने मागोवा घेता येईल असा उच्च प्रमाणित दर्जाचा ‘कस्तुरी कापूस कार्यक्रम’ सुरु आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाने भारतीय कापूस महामंडळ, सीएआय आणि सीआयटीआय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत 2 ते 5 डिसेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या 81व्या पूर्ण बैठकीसाठी कार्यक्रम माहितीपत्रकाचे अनावरण केले. या कार्यक्रमाची संकल्पना “कापूस मूल्य साखळी : जागतिक प्राधान्यक्रमासाठी स्थानिक नवोन्मेष” अशी आहे, ज्यामध्ये 27 हून अधिक देशांमधील 400 हून अधिक प्रतिनिधी आणि निरीक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content