Homeचिट चॅटकुस्तीतल्या कामगिरीसाठी विजय...

कुस्तीतल्या कामगिरीसाठी विजय चौधरींना सन्मानचिन्ह

कुस्तीचा अखाडा गाजवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू, पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांना कुस्तीतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर करण्यात आले आहे.

राज्य पोलीस दलात विविध पदांवर काम करताना आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या कर्तृत्त्ववान पोलिसांना महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, या प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केले आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हॅटट्रिक नोंदविणार्‍या विजय चौधरीने महाराष्ट्र पोलीस दलात दोनवेळा सुवर्णपदक जिंकले. तसेच २०२३ साली कॅनडा येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावले होते.

भविष्यातील मोठ्या कुस्ती स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव असेच उंचाविण्यासाठी मी अथक परिश्रम घेणार असल्याचे विजय चौधरी यांनी सांगितले. पोलीस खात्याचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विजय चौधरींवर चोहोबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत असून मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सध्या विजय चौधरी आपले गुरू हिंदकेसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदकेसरी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहेत.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content