Homeडेली पल्स‘मास्टरक्लासेस’ आणि ‘इन-कन्व्हर्सेशन’...

‘मास्टरक्लासेस’ आणि ‘इन-कन्व्हर्सेशन’ 54व्या IFFIचे मुख्य आर्कषण!

मायकेल डग्लस, पंकज त्रिपाठी, झोया अख्तर, यामध्ये काही साम्य आढळले का? हे सगळे जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते/अभिनेते आहेत, ज्यांनी चित्रपट निर्मिती/अभिनयातील त्यांच्या सर्जनशील कौशल्याने अनेकांची मने जिंकली आहेत आणि  ते 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इन-कन्व्हर्सेशन सत्र घेणार आहेत. या उत्कंठावर्धक महोत्सवात चित्रपट निर्मितीची कला आणि कौशल्यावर मास्टरक्लासेस आणि इन-कन्व्हर्सेशन सत्रासाठी सज्जता झाली आहे.  

या वर्षीच्या इफ्फीमध्ये प्रख्यात चित्रपट निर्माते, सिनेमॅटोग्राफर आणि कलाकारांबरोबर 20 हून अधिक मास्टरक्लास आणि इन-कन्व्हर्सेशन सत्रे रंगणार आहेत. गोव्यातील पणजी येथील फेस्टिव्हल माईल येथे नूतनीकरण केलेल्या कला अकादमीमध्ये सत्रे होतील. ब्रेंडन गॅल्विन, ब्रिलेंट मेंडोझा, सनी देओल, राणी मुखर्जी, विद्या बालन, जॉन गोल्डवॉटर, विजय सेतुपती, सारा अली खान, नवाजुद्दीन सिद्धीकी, केके मेनन, करण जोहर, मधुर भांडारकर, मनोज बाजपेयी, कार्तिकी गोन्साल्विस, बोनी कपूर, अल्लू अरविंद, थिओडोर ग्लक, गुलशन ग्रोव्हर आणि अन्य यावर्षीच्या सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत.

हॉलीवूडचे महान अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस ‘इज इट टाइम फॉर वन वर्ल्ड सिनेमा?’ या विषयावर विशेष इन-कन्व्हर्सेशन सत्रात सहभागी होणार असून सखोल अंतर्दृष्टी आणि अर्थपूर्ण व्याख्यानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी ही पर्वणी असेल. या जगविख्यात अभिनेत्याला इफ्फीमध्ये या वर्षीचा प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

मास्टरक्लासेस चित्रपट निर्मिती प्रक्रियेची केवळ एक दुर्मिळ झलकच सादर करत नाही, तर तो एक सखोल अनुभव असतो, जो सहभागी झालेल्यांना कथाकथन, सिनेमॅटोग्राफी आणि चित्रपट निर्मितीच्या उद्योगामागील सर्जनशील प्रक्रियेची सर्वांगीण ओळख करून देतो. ‘चित्रपट दिग्दर्शन’ बाबत या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ब्रिलॅंट मेंडोझा यांच्याकडून शिकण्याची एक नामी संधी देत, हे सत्र नवोदित चित्रपट रसिकांना मोलाचे मार्गदर्शन पुरवते.

‘मास्टरक्लासेस’ आणि ‘इन-कन्व्हर्सेशन’ सत्रांची ही अभिनव पद्धत चित्रपट रसिकांना जागतिक दर्जाच्या दिग्दर्शक/तज्ज्ञांद्वारे आत्म-चिंतन, स्मृती आणि संकल्पनाच्या माध्यमातून चित्रपट निर्मितीच्या विविध विषयांचा धांडोळा घेण्याची अनोखी संधी देते.

या वर्षी, आणखी एक चांगली  बातमी तुमच्या प्रतीक्षेत आहे, मास्टरक्लासेससाठी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आणि नोंदणी विनामूल्य आहे. अधिक तपशीलांसाठी https://www.iffigoa.org/mcic.php ला भेट द्या.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content