Homeचिट चॅटरायगडमधल्या कुणबी जोडो...

रायगडमधल्या कुणबी जोडो अभियानाला जोरदार प्रतिसाद

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 75 वर्षे होऊनही कोकणातील कुणबी समाज उपेक्षितच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तसेच समाज संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने कुणबी समाजोन्नती संघातर्फे रविवारपासून रायगड जिल्ह्यात कुणबी जोडो अभियान छेडण्यात आले आहे.

डिसेंबर 2022मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कोकणातील कुणबी जोडो अभियानाची सुरुवात झाली. मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघ या शतकोत्तरी वाटचाल केलेल्या मातृसंस्थेच्या वतीने, 8 जानेवारी रोजी महाड पोलादपूर तालुक्यातील बारा ते पंधरा हजार कुणबी समाजबांधव एकत्र आले होते. महाड तालुक्यातील पाचाड गावी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली काढली गेली. लोकनेते माजी आमदार शांताराम फिलसे यांच्या जन्मभूमी चिंभावे गावी तालुकास्तरीय कुणबी जोडो अभियान रॅलीचा समारोप झाला.

कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांच्या प्रमुख नेतृत्त्वाखाली, कुणबी राजकीय संघटन समिती अध्यक्ष अशोक वालम यांच्या प्रयत्नातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, पालघर, मुंबई नवी मुंबई, मुंबई उपनगर क्षेत्रात कुणबी जोडो अभियान राबविले जात आहे. महाड-पोलादपूर तालुकाध्यक्ष अनंत गवळकर यांच्या पुढाकाराने 8 जानेवारी रोजी तालुक्यातील 9 गट आणि हजारोंच्या संख्येने कुणबी समाज बांधव-भगिनी अभियानात सहभागी झाले. कुणबी समाजोन्नती मंडळ महाड-पोलादपूर मध्यवर्ती अध्यक्ष प्रदीप लोखंडे, सरचिटणीस प्रकाश तरळ, कोषाध्यक्ष संभाजी काजरेकर, कुणबी युवा संघाचे सहसचिव मिलिंद चिबडे आदींनी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कुणबी समाजोन्नती संघातर्फे रायगड़ ज़िल्ह्यातील सर्व तालुका शाखांच्या कुणबी जोडो अभियानाचा कार्यक्रम 15 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पुढील कार्यक्रम असा: 10 जानेवारी- म्हसळा, 11 जानेवारी- श्रीवर्धन, 12 जानेवारी- तळा, 13 जानेवारी-  रोहा, 14 जानेवारी- मुरुड, अलिबाग, 15 जानेवारी- पेण, उरण, कर्जत, खालापूर, पाली आणि संध्याकाळी पनवेल येथे समारोप.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content