Friday, November 22, 2024
Homeकल्चर +'श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी'वरील...

‘श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी’वरील टीकेचा मराठी अनुवाद प्रकाशित

श्रीक्षेत्र मंत्रालयम् येथील श्री राघवेंद्र स्वामी यांनी १७व्या शतकात लिहिलेल्या ‘श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी’ या लघुग्रंथावरील टीकेच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज मुंबईत राजभवनात करण्यात आले.

यावेळी श्री राघवेंद्र स्वामी मठ, मंत्रालयम् येथील विद्यमान पिठाधिपती स्वामी सुबुधेन्द्र तीर्थ, मुंबईतील मठाचे विश्वस्त रामकृष्ण तेरकर व अनुवादकर्ते प्रा. गुरुराज कुलकर्णी उपस्थित होते. मंत्रालयम्, आंध्र प्रदेश येथील श्री राघवेंद्र स्वामी यांनी वेद, उपनिषद, प्रभू राम चरित्र व श्री कृष्ण चरित्र यांसह विविध विषयांवर लिखाण करून वेदांचे सार सोप्या भाषेत सामान्यजनांना उपलब्ध करून दिले.

‘श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी’ केवळ २७ श्लोकांचे संकलन असले तरीही ते श्रीमद भगवद्गीतेप्रमाणे सारगर्भित असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या ग्रंथावरील टीका प्रा. गुरुराज कुलकर्णी यांनी मराठी भाषेत आणल्यामुळे सदर ग्रंथ मराठी भाषिकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा ग्रंथ हिंदी व इतर भारतीय भाषांमध्येदेखील अनुवादित केला जावा तसेच त्याचे ऑडिओ बुकदेखील तयार केले जावे अशी अपेक्षा राज्यपाल बैस यांनी व्यक्त केली.

श्री राघवेंद्र स्वामी यांनी ३५० वर्षांपूर्वी मंत्रालयम् येथे संजीवन समाधी घेतली. आपल्या जीवनकाळात त्यांनी ४८ ग्रंथांची निर्मिती केली. रामायण व महाभारताचे सार त्यांनी लिहिले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. द्रविड देशातील भक्ती-ज्ञानाची अभिवृद्धी महाराष्ट्रात झाली असे सांगत ‘श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी’ ग्रंथ मराठी भाषेत भाषांतरित झाल्याबद्दल पिठाधिपती सुबुधेन्द्र तीर्थ यांनी संतोष व्यक्त केला. 

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content