Homeचिट चॅटमनोहर कुंभेजकर महाराष्ट्र...

मनोहर कुंभेजकर महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

परभणी येथील जयहिंद सेवा भावी शिक्षण संस्थेच्या रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी वर्धा येथे झालेल्या गौरव पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुंभेजकर यांचा उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन वर्ध्याचे भाजपा खासदार रामदास तडस आणि हरियाणा उच्च न्यायालय, चंदीगडचे माजी न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्या हस्ते हा  गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराष्ट्र विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, नागपूर पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत उदगीर, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, जयहिंद सेवा भावी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक सत्तार इनामदार, मुंबई आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील कुमरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मनोहर कुंभेजकर १९९५पासून पत्रकारितेत असून त्यांनी विविध वर्तमानपत्रात काम केले आहे. दांडगा जनसंपर्क, राजकीय, सामाजिक, महापालिका, नागरी समस्या तसेच कोळीवाडे व आदिवासी बांधवांच्या विविध समस्या त्यांनी सातत्याने मांडल्या आहेत. १५ जानेवारी २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्सोवा फेस्टिव्हलमध्ये त्यांना वर्सोवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. १९ जून २०२३ रोजी भांडुप नवजीवन शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सन्मानित केले होते.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content