Saturday, April 19, 2025
Homeहेल्थ इज वेल्थआंब्याच्या चवीचा याकुल्ट...

आंब्याच्या चवीचा याकुल्ट लाइट बाजारात

जागतिक ख्यातीचा प्रोबायोटिक ब्रँड असलेल्या याकुल्ट डेनॉन इंडिया प्रा. लि.ने काल याकुल्ट लाइट मँगो फ्लेवर, हा नवीन प्रकार सादर करत आपल्या उत्पादन पोर्टफोलिओच्या विस्ताराची घोषणा केली. या कार्यक्रमाला बॉलीवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा, मंत्री आणि भारतातील जपानच्या दूतावासाचे मिशन डेप्युटी चीफ ताकाशी अरियोशी, याकुल्ट डॅनोन इंडिया प्रा. लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर ईजी अमानो आणि याकुल्ट डॅनोन इंडिया प्रा. लि.चे सायन्स अँड रेग्यूलेटरी अफेअर्स हेड डॉ. नीरजा हजेला उपस्थित होते.

याकुल्ट लाइट मँगो फ्लेवर हे सिग्नेचर याकुल्टचे सिस्टर प्रॉडक्ट आहे. नवीन उत्पादनात मूळ आणि फ्लॅगशिप याकुल्टच्या 650 कोटी रुपयांच्या रकमेइतकेच अद्वितीय प्रोबायोटिक, लॅक्टोबॅसिलस केसी शिरोटा (शिरोटा स्ट्रेन) आहे. याकुल्ट लाइट मँगो फ्लेवरची किरकोळ किंमत 28 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांमधील किरकोळ विक्री दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या 5 बाटल्यांच्या पॅकेटसाठी 100 रुपये असेल. तसेच, याकुल्टचे एक अभिनव होम डिलिव्हरी सेल्स चॅनल आहे, जिथे सुमारे 300 ‘याकुल्ट लेडीज’ दिल्ली एनसीआर, चंदीगड, जयपूर, मुंबई आणि पुणे येथील ग्राहकांच्या दारापर्यंत उत्पादने पोहोचवतात. याकुल्ट लाइट मँगो फ्लेवरसह याकुल्ट उत्पादनेदेखील ई-कॉमर्सद्वारे उपलब्ध आहेत.

मूळ प्रोबायोटिक पेयाचा शोध डॉ. मिनोरु शिरोटा नावाच्या जपानी डॉक्टरांनी लावला होता. आतड्यांपर्यंत जिवंत बॅक्टेरिया पोहोचवतप्रचंड आरोग्य फायदे देण्याची क्षमता असलेल्या मानवानुकूल जीवाणूचा वापर करण्यासाठी त्याची रचना केली होती. 1900च्या दशकाच्या सुरुवातीला जपानमध्ये अपुरी स्वच्छता आणि गरिबीमुळे संसर्गाजन्य आजारांपायी मुलांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या शिरोटा यांनी रोग आणि संसर्ग झाल्यानंतर रोगनिवारण करण्याऐवजी प्रोबायोटिक्सच्या सामर्थ्याने रोग रोखण्यावर भर दिला. त्यांनी बाजारात अन्न म्हणून शिरोटा स्ट्रेन सुरू करून त्यांच्या आदर्शाला मूर्त रूप दिले, जेणेकरून शक्य तितक्या लोकांना स्वादिष्ट चवीच्या प्रोबायोटिक बॅक्टेरियाचा लाभ मिळू शकेल. 90 वर्षांहून अधिक काळाच्या संशोधनातूनशिरोटा स्ट्रेनचे नियमित सेवन केल्यास पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत होते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. डॉ. शिरोटांच्या तत्त्वज्ञानावर आधारित,भारतातील याकुल्ट कंपनीने भारतातील अधिक लोकांच्या आरोग्यासाठी योगदान देण्यासाठी याकुल्ट लाइट मँगो फ्लेवर हे आवडत्या राष्ट्रीय फळाच्या चवीचे उत्पादन सुरू केले.

याकुल्ट लाइट मँगो फ्लेव्हरच्या लाँचिंगविषयी बोलताना याकुल्ट डॅनोन इंडिया प्रा. लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर ईजी अमानो म्हणाले की, याकुल्टमध्ये आमचे मूळ तत्त्वज्ञान अद्वितीय प्रोबायोटिक स्ट्रेन “लॅक्टोबॅसिलस केसी शिरोटा स्ट्रेन”चा वापर करून जगभरातील ग्राहकांच्या आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्याचा आहे. भारतात दररोज याकुल्टच्या 2 लाखांहून अधिक बाटल्या वापरल्या जात असल्याने अनेक कुटुंबे त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग म्हणून याचा आनंद घेत आहेत. याकुल्ट हे एक घरगुती नाव बनले आहे. याकुल्ट लाइट मँगो फ्लेव्हरच्या शुभारंभासह आम्ही भारतीय ग्राहकांच्या आवडी आणि प्राधान्यांची पूर्तता करण्यासाठी आमच्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करीत आहोत. हा नवीन प्रकार आपल्या अभिजात याकुल्टप्रमाणे आरोग्यविषयक फायदे देतो आणि आंब्याची एक आल्हाददायक चव सादर करतो. ही चव सर्वपसंतीची आहे. उत्पादन पोर्टफोलियोतील ही भर आंब्याची चव पसंत असणाऱ्या आमच्या ग्राहकांना आवडेल, हा आमचा विश्वास आहे.

या लॉन्चप्रसंगी आपली भूमिका मांडताना अभिनेत्री सान्या मल्होत्रा म्हणाली की, या रोमांचक लॉन्चचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अनियमित जीवनशैली, अपुरे पोषण, तणाव, पुरेशी झोप नसणे, प्रदूषण तसेच सामान्यतः आतड्यांचे वाईट आरोग्य यामुळे जीवनशैलीशी निगडीत विकारांमध्ये वाढ होत असल्याबद्दल मोठी चिंता सतावते. माझे आतडे निरोगी ठेवण्यासाठी प्रोबायोटिक्सचा माझा दररोजचा डोस घेते. तसेच याकुल्ट हा आता बऱ्याच काळापासून माझ्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. आज कंपनीने याकुल्ट लाइट मॅंगो फ्लेव्हर सादर केल्याचा आनंद वाटतो. ही चव ताजेतवाने ठेवणारी आहे. सर्व आंबा आणि याकुल्टप्रेमींना ही चव नक्कीच आवडेल याची मला खात्री वाटते. 

याकुल्ट डॅनोन इंडिया प्रा. लि.च्या सायन्स अँड रेग्युलेटरी अफेअर्स हेड डॉ. नीरजा हजेला म्हणाल्या की, लॅक्टोबॅसिलस केसी स्ट्रेन शिरोटा (शिरोटा स्ट्रेन) हा याकुल्टसाठी अद्वितीय आहे. तसेच भारतासह जगभरातील 100हून अधिक मानवी अभ्यासांद्वारे समर्थित आहे. प्रोबायोटिक्स आवश्यक आहेत. कारण ते आतड्यातील चांगले जीवाणू वाढवतात आणि हानिकारक रोगकारक जीवाणू कमी करतात. याचे सेवन केल्यास अन्नाचे चांगले पचन, पोषक तत्त्वांचे योग्य शोषण आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती सुनिश्चित होते. आतड्यांमधील प्रोबायोटिक जीवाणूंमधील घट आणि वाईट जीवनशैलीमुळे आतड्यांचे आरोग्य बिघडू शकते. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे थकवा, खराब वाढ आणि विकास, कुपोषण आणि वारंवार संसर्ग होऊ शकतो. आतडे निरोगी ठेवण्यासाठी, वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित प्रोबायोटिक उत्पादनांद्वारे दैनंदिन आहारात प्रोबायोटिक्सचा समावेश करणे आवश्यक आहे.

Continue reading

तब्बल 40 वर्षांनी भारताचे दुसरे अंतराळवीर झेपावणार अवकाशात

अंतराळ क्षेत्रात वाटचालीत एक नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत सज्ज झाला असून, पुढच्या महिन्यात भारतीय अंतराळवीराचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम आयोजित होणार आहे. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांषू शुक्ला, ऍक्झियॉम स्पेसच्या एएक्स-4 मोहिमेचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ...

पोराचा बाजार उठला रं…

जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं शीर्षकगीत रिलीझ करण्यात आलं. त्यापाठोपाठ आता याच चित्रपटाचं नवं रोमॅन्टिक गाणं 'पोराचा बाजार उठला रं..' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सूरज चव्हाण, जुई...

‘एप्रिल मे 99’ने होणार मराठी चित्रपट महोत्सवाला सुरूवात

मुंबईच्या प्रभादेवीतल्या महाराष्ट्र कला अकादमीमधील पु. ल. देशपांडे सभागृहात येत्या २१ ते २४ एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४१ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन २१ एप्रिलला सायंकाळी ६...
Skip to content