Saturday, July 6, 2024
Homeचिट चॅटतमिळींच्या स्वयंपाकगृहात मालवणी...

तमिळींच्या स्वयंपाकगृहात मालवणी खाद्यपदार्थ!

आपल्याला मुंबई, महाराष्ट्रात जगभरातील खाद्यपदार्थांची रेलचेल पाहण्यास मिळते. अनेक खाद्यसंस्कृती, परंपरा आपण स्वीकारत असल्याने जिभेवर रेंगाळणारे अद्भूत चवदार पदार्थ महाराष्ट्रात उपलब्ध होत असतात. परंतु आपले मराठमोळे खाद्यपदार्थ इतर राज्यात अभावानेच चाखायला मिळतात. तमिळनाडूतील ‘रेन ट्री’ या चेन्नईतील प्रसिद्ध पंचतारांकित रेस्तराँमध्ये आपल्या मालवणी खाद्यपदार्थांचा ७ दिवसांचा महोत्सव आयोजित करून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा नुकताच सन्मान केला गेला.

महाराष्ट्रासाठी आणि खासकरून कोकण-मालवणसाठी ही अभिमानाची गोष्ट असून मुंबई, मालवण येथील ‘चैतन्य’ या अस्सल मालवणी खाद्यगृहाच्या सुरेखा वाळके आणि नितीन वाळके, सायली वाळके, प्रथमेश कुलकर्णी यांना हे श्रेय जाते. मालवणी खाद्यपदार्थांचा नुसता महोत्सव न करता आपले पदार्थ कसे बनवावेत? आणि कसे सर्व्ह करावेत? याचे प्रशिक्षणही तेथील प्रशिक्षित शेफना देऊन ते तमिळींना मालवणी पदार्थांचा लळा लावण्यात यशस्वी झाले आहेत.

मालवण ते मुंबई असा प्रवास करत घरगुती जेवणाला अस्सल मालवणी ते ऑथेंटिक मालवणी क्युझाईन अशी ओळख निर्माण करण्यापर्यंतची मजल मारत वाळके दाम्पत्याने ‘चैतन्य’ची ३० वर्षांपूर्वी स्थापना केली. आज यात एका नाविन्यपूर्ण गोष्टीची भर पडली आहे. चेन्नईच्या ‘रेन ट्री’ हॉटेलमध्ये तमिळ खाद्यप्रेमींसाठी आपल्या अस्सल चवीच्या मालवणी खाद्यपदार्थांच्या खास रेसिपी या महोत्सवात चैतन्य ग्रुपने सादर तर केल्याच परंतु तेथील प्रशिक्षित शेफना आपले पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले. एक आठवडाभर चाललेल्या या महोत्सवाला खाद्यप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. तमिळींनी नुसते आपले खाद्यपदार्थच स्वीकारले असे नसून त्यांनी आपल्या संस्कृती आणि परंपरेबद्दलही कमालीचा आदर व्यक्त केल्याचे दिसून आले.

द टेस्ट ञफ मालवण, या सात दिवसांच्या या मालवणी खाद्यमहोत्सवामध्ये पॉप-अप पद्धतीच्या कार्यक्रमात सेट मेनू म्हणजेच थाळी व बुफे अशा दोन्ही तऱ्हेने चेन्नईचे खाद्यरसिक मालवणी जेवणाचा आस्वाद घेत होते. मालवणी मसाल्यातील बटाटेवडे ते ओल्या काजूची उसळ, कुळथाची पिठी ते माश्याचं तिखलं, आमटी, भाजलेले मासे, भरलेले पापलेट, कोळंबीभात ते चिकन सागोती, वडे, भाकरी आणि मालवणी जेवणाची भैरवी सोलकढी अशी रेलचेल असलेले चविष्ट पदार्थ खाऊन ते तृप्त झाले. तमिळी अस्सल खवय्यांचा मिळालेला प्रतिसाद मालवणी खाद्यपदार्थांचा लौकिकार्थाने सन्मान वाढवत असून परराज्यातील खवय्यांना तृप्त करण्याची ‘चैतन्य’ला संधी प्राप्त झाली, हा अनुभव परकाया प्रवेशासारखा होता असे सुरेखा वाळके सांगतात.

Continue reading

आनंद घ्या नंदिनी वर्माच्या ‘फ्लो ऑफ लाईफ’चा!

राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईच्या काळाघोडा येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. 'फ्लो ऑफ लाईफ' हे नंदिनी वर्मा यांचे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत म्हणजेच ७ जुलैपर्यंत खुले राहणार आहे.

मुंबईत फेरीवाल्यांकडून होत असलेली वीजचोरी उजेडात

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरूद्ध चाललेल्या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी केलेली वीजचोरी उजेडात आली आहे. विजेच्या खांबांवरून वीजचोरी करणाऱ्या दादर रेल्वेस्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरिवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई करताना काल पालिकेने अनेक अनधिकृत वीजजोडण्या खंडित...

दक्षिण मुंबईतल्या हिंदू मंदिरांचे जतन होणार?

मुंबईतल्या गिरगाव/दक्षिण मुंबईतील हिंदू मंदिरांचे जतन, संरक्षण व संवर्धन व्हावे, गिरगावचा सांस्कृतिक वारसा जतन केला जावा यासाठी मुंबई हिंदू मंदिर, जतन, संरक्षण, संवर्धन अभियान, गिरगाव सांस्कृतिक वारसा जतन अभियान, मुंबई विकास परिषद, मुंबई भाडेकरू संघर्ष समितीचे निमंत्रक व संयोजक...
error: Content is protected !!