Homeचिट चॅटउद्यापासून बोरीवलीत मालवणी...

उद्यापासून बोरीवलीत मालवणी महोत्सव

मुंबईतल्या मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ तसेच १२च्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार, ४ जानेवारीपासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरच्या अनंतराव भोसले मैदानावर मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मालवणी

शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता परंपरेप्रमाणे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील श्री देव गिरोबा मंदिराच्या प्रतिकृती आणि बालनगरी व बाजारपेठेचे महाआरती तसेच पारंपरिक गाऱ्हाणे घालून उद्घाटन करण्यात येणार आहे. या मालवणी महोत्सवाचे यंदाचे २७वे वर्ष असून येत्या रविवार, १२ जानेवारीपर्यंत कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध होणार आहे. रोज सायंकाळी ७ वाजता श्री देव गिरोबाची वाजंत्री तरंगासह पालखी आणि रात्री ८ वाजता दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती उत्सवप्रमुख नंदकुमार मोरे यांनी दिली.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content