Homeब्लॅक अँड व्हाईटमतदारांच्या तक्रार निवारणात...

मतदारांच्या तक्रार निवारणात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

भारतात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागालँड पहिल्या तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र नागालँडमध्ये आतापर्यंत फक्त १८ तर गुजरातमध्ये ७१२४ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. महाराष्ट्रात मात्र आतापर्यंत १४ हजार ७५३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तक्रारींमध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे २ हजार ८१८, मुंबई उपनगरातून २ हजार ३३१ आणि ठाण्यातून २ हजार १८३ तक्रारी आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातून सर्वात कमी म्हणजे ३४ तक्रारी आलेल्या आहेत.

मतदार

सर्वाधिक तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र प्राप्त न झालेल्यांमध्ये ४ हजार ५५६ तक्रारींचा समावेश आहे. मतदार ओळखपत्रावरील दुरुस्त्या करण्यास विलंब झाल्याबद्दल १ हजार ८४८ तक्रारी आल्या आहेत. ई- मतदार ओळखपत्राविषयी १०४७ तक्रारी आहेत. नवे ओळखपत्र मिळवण्याचा अर्ज नाकारल्याबद्दल ५२१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. मतदारयादीत नाव न सापडल्याबद्दल ५०० तक्रारी आलेल्या आहेत.

तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र, मतदारयादी, मतदान चिट्ठी (स्लिप), निवडणूक आयोगाची विविध अॅप्स, राजकीय पक्ष, मतदान दिन आणि इतर या विषयांवरील तक्रारींचा समावेश आहे. मतदारांच्या तक्रारींचे निवारण करताना त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जातात. मतदार ओळखपत्र प्राप्त न झालेल्या मतदारांना मतदार नोंदणीपासून ओळखपत्र मिळेपर्यंतचा कालावधी साधारण ४५ दिवसांचा असतो. मात्र ई-ओळखपत्र दहा-बारा दिवसांत मिळू शकते. त्यासाठी त्यांनी मतदारयादीत मोबाईल क्रमांक नोंदवावा, असे सांगितले जाते. कोणाला मतदारयादीत नाव सापडत नसल्यास त्यांना नाव शोधण्याची प्रक्रिया सांगितली जाते. तसेच कोणाचे नाव वगळले गेले असल्यास त्याचे कारण आणि प्रक्रिया सांगितली जाते. प्रश्नकर्त्यांचे उत्तराने समाधान न झाल्यास त्याला पुन्हा प्रश्न विचारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content