Homeचिट चॅटमहाराष्ट्रात 23 वर्षानंतर पहिल्यांदाच...

महाराष्ट्रात 23 वर्षानंतर पहिल्यांदाच राज्य ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन!

महाराष्ट्रात 2022-23 मध्ये होणाऱ्या राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा मंत्री गिरीष महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत नागपूर विधानभवनात काल करण्यात आले. राज्यात 23 वर्षानंतर अशा स्पर्धांचे आयोजन होत आहे तसेच राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23ची माहिती

राज्यात क्रीडा संस्कृतीचे जतन करणे व क्रीडा वातावरण निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जात्मक खेळ पाहण्याची संधी नागरिक व नवोदित खेळाडू यांना उपलब्ध व्हावी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्याचा नावलौकिक व अधिक पदके प्राप्त व्हावीत, यासाठी राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे व स्पर्धेच्या संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.  यासाठी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहेत.

राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. दिनांक 2 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत 9 जिल्ह्यांत 39 क्रीडा प्रकारात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 3 हजार 857 पुरुष व 3 हजार 587 महिला खेळाडू असे एकूण 7 हजार 444 खेळाडू सहभागी होणार आहेत. क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक, तांत्रिक अधिकारी  यांच्यासह एकूण 10 हजार 456 जणांचा सहभाग असणार आहे.

क्रीडा ज्योतरायगड, नागपूर, बारामती- पुणे, लातूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, अमरावती येथून आज, दि. 30 डिसेंबर 2022 रोजी पुणे येथे आणण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धेसाठी 19.08 कोटी रुपये व जिल्हा वार्षिक योजनेतून 11.51 कोटी रुपये असे एकूण 30.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

जिल्हानिहाय होणाऱ्या स्पर्धा

1. पुणे- ॲथलेटिक्स, फूटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युदो, लॉन टेनिस, मॉडर्न पँन्टाथलॉन, शुटींग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलींग,स्क्वॅश, बॉक्सींग, हॉलीबॉल, रोलर स्केटींग,गोल्फ, सॉफ्ट टेनिस. 

2. नागपूर- बॅडमिंटन, नेटबॉल, हॅण्डबॉल, सेपक टकरा.

3. जळगाव- खो-खो, सॉफ्टबॉल, मल्लखांब, शुटींगबॉल.

4. नाशिक- रोईंग, योगासन.

5. मुंबई- याटींग, बास्केटबॉल.

6. बारामती- कबड्डी.

7. अमरावती- आर्चरी.

8. औरंगाबाद- तलवारबाजी.

9. सांगली कनाईंग- कयाकिंग.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content