Homeपब्लिक फिगरहा पाहा महायुती...

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवतो, तरीही महायुती सरकार ठोस कारवाई करीत नाही. याउलट पुण्यामध्ये गणपती मंडळांवर त्वरित खटले दाखल होतात. यातून महायुती सरकारचा दुटप्पीपणा दिसून येतो. काँग्रेस अल्पसंख्यांकांच्या दबावासमोर झुकते असा कायम प्रचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अल्पसंख्यांकातील एका समुदायाच्या आर्थिक ताकदीपुढे जणू शरणागतीच पत्करली आहे. यातून भा. ज. प. चा दुतोंडी चेहेरा उघड झाला आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते प्रा. अनंत गाडगीळ यांनी नुकताच केला आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कोल्हापूरच्या हत्तीणीच्या प्रश्नाने जनतेच्या दुखावलेल्या भावना, दादरच्या कबुतरांच्या प्रश्नाने प्रदूषित झालेले वातावरण, वांद्र्याच्या वाघाने शिवाजीपार्कवर सुरु केलेला फेरफटका, या साऱ्या घटना हाताळताना महायुती सरकारची ‘सर्कस’ झाली आहे. सर्कसमध्ये ‘तारेवरची कसरत’, हे एक मोठे आकर्षण असते. कोल्हापुरातील हत्तीण आणि
वनतारातील ‘अंबारी’, दोन्ही सांभाळताना महायुती सरकारचीच तारेवरची कसरत होत आहे.

याशिवाय, सर्कशीमध्ये विदूषकाने विचित्र वक्तव्य करताच रिंगमास्टर त्याला फटका देतो. तेच चित्र राज्यातील मंत्र्यांचे वर्तन व वक्तव्यांनंतर राज्यात दररोज दिसून येत आहे. आतातर बांद्र्याच्या वाघाच्या आसनव्यवस्थेवर ‘सिंहां’सनावर बसलेले प्रतिक्रिया देऊ लागल्यामुळे एकंदरीत महायुती सरकारने स्वतःला ‘लाफ्टर क्लब’च बनविले आहे, अशी टीकाही प्रा. गाडगीळ यांनी केली.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content