Thursday, September 19, 2024
Homeडेली पल्सभारतातील विद्यार्थ्यांसाठी लीड ग्रुपचे...

भारतातील विद्यार्थ्यांसाठी लीड ग्रुपचे टेकबुक तयार

भारतातील सर्वात मोठी स्कूल एडटेक कंपनी लीड ग्रुपने टेकबुक सादर करण्याची नुकतीच घोषणा केली. हे पारंपरिक पाठ्यपुस्तक-आधारित शिक्षणाला बदलण्यासाठी डिझाइन केलेले एक इंटेलिजंट बुक आहे. टेकबुक आजच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये मुख्य शिक्षण आव्हानांवर उत्तर देण्यासाठी तीन अत्याधुनिक तंत्रज्ञानअनुकूल अभ्यासक्रम सादर करते.

लीड ग्रुपचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत मेहता म्हणाले की, शतकानुशतके, वर्गखोल्यांमधील प्राथमिक शिक्षण साधन म्हणून पाठ्यपुस्तकात कोणताही बदल झालेला नाही. तर  त्याचवेळी एआय आणि एआर/व्हीआरने जगाला वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रात वैयक्तिकृत, बहुपद्धती आणि गेमिफाईड अनुभवांकडे नेले आहे. आम्ही आपल्या देशाच्या भविष्यासाठी काहीतरी आणले आहे. टेकबुक हा तंत्रज्ञान, अध्यापनशास्त्र आणि अभ्यासक्रमातील अनेक वर्षांच्या संशोधनाचा एक क्रांतिकारी परिणाम आहे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पद्धत यामुळे कायमस्वरूपी बदलेल. २०२८पर्यंत,  देशभरातली शाळेच्या वर्गांमध्ये वैयक्तिकृत आणि संवादात्मक शिक्षण हा मापदंड बनत भारतातील अग्रणी५००० शाळा टेकबुकसाठी अपग्रेड होतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

हे बुक पारंपरिक पाठ्यपुस्तकांच्या मर्यादांना दूर करून वैयक्तिकृत आणि संवादात्मक शिक्षण अनुभव सादर करते. विविध शिक्षण स्तर असलेल्या वर्गखोल्यांमध्ये, प्रत्येक विद्यार्थ्याला सक्षम करते.

यामध्ये तीन शक्तिशाली वैशिष्ट्ये एकत्रितपणे आहेत:

ऑग्मेंटेड रिअॅलिटी: पारंपारिक 2D पाठ्यपुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना मूलतः 3D स्वरूपातील जटिल  संकल्पना समजून घेण्यात मर्यादा येतात. हे बुक विज्ञान आणि गणितासारख्या विषयांना  ऑग्मेंटेडरिअॅलिटी इन्स्ट्रक्टरसह (ARI) प्रत्यक्षात आणते. त्यामुळे विद्यार्थ्यांना 3Dमधील विषयांचा अभ्यास करता येतो.

वैयक्तिकृत वाचन प्रवाहीपणा: भाषाशिक्षणासाठी, टेकबुकचा इंडिपेंडंट रीडिंग असिस्टंट (IRA) वैयक्तिक शिक्षकाच्या भूमिकेत काम करतो, तो विद्यार्थ्यांना पुस्तक वाचून दाखवतो. तसेच विद्यार्थ्यांच्या  वाचनावर लक्ष ठेवून त्यांचे वाचनातील कौशल्य, प्रवाहीपणा आणि उच्चारांवर लक्ष ठेऊन तत्काळ योग्य त्या सूचना देतो.

वैयक्तिकृत सराव:  पर्सनलाइज्ड इंटरएक्टिव्ह एक्सरसाइजेससह (PIE), विद्यार्थ्यांना सोडवता येतील असे अमर्यादित सराव प्रश्न मिळतात. त्यामुळे शिक्षण आनंददायी आणि सातत्यपूर्ण बनवत विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या गतीने विषयांचा अभ्यास करू शकतात.

सुमीत यांनी पुढे स्पष्ट केले की, पहिल्या वर्षात, टेकबुक देशातील आघाडीच्या ४०० नवनिर्माणाला प्रेरक शाळांसाठी ‘इनव्हाइट-ओन्ली’ प्रकारात उपलब्ध असतील. आम्हाला शिक्षणाचा एक नवीन मापदंड प्रस्थापित करायचा आहे आणि विद्यार्थीकेंद्रित पद्धतीने आणि शिक्षकांना सहाय्यकारी बनवून शाळांमध्ये AI आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात भारत आघाडीवर आहे हे जगाला दाखवायचं आहे.

लीड ग्रुपच्या सहसंस्थापक आणि सहमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देओराह म्हणाल्या की, पाठ्यपुस्तके हातात घेऊन वाचण्याच्या स्पर्शीय अनुभवाला तंत्रज्ञानाच्या शक्ती आणि सखोल संशोधनपूर्ण शैक्षणिक आशयासोबत एकत्र करून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा शैक्षणिक प्रवास खऱ्या अर्थाने सुधरवणारे उच्च गुणवत्तेचे, वैयक्तिकृत शिक्षण मिळेल हे सुनिश्चित करत आहोत. या बुकसोबत, आम्ही एक असे वातावरण निर्माण करत आहोत जिथे शिक्षण फक्त पाठांतरावर नाही, तर शोध, सृजनशीलता आणि  कौशल्य मिळविण्याबाबतदेखील असेल.

गेल्या वर्षभरात, लीड समूहाने उच्चशुल्क असलेल्या शाळांपासून स्वस्त, परवडणाऱ्या शाळांपर्यंत भारतातील शाळांच्या संपूर्ण श्रेणींना सेवा देण्यासाठी आपल्या क्षमता वाढवल्या आहेत. उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टता साध्य करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर शाळांना पाठबळ देण्यासाठी आपल्या योजना वाढवण्यावर या समूहाने लक्ष केंद्रित केले आहे. २०२८पर्यंत देशभरातील ६०,०००पेक्षा जास्त शाळांना उच्च गुणवत्तेचे, स्कूल एडटेक सोल्यूशन्स प्रदान करण्याचे आपले उद्दिष्ट लवकर साध्य करण्याचा समूहाचा विचार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...

राडोची दोन नवीन घड्याळे बाजारात

अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट सुपर ज्युबिल ही दोन अफलातून घड्याळे घेऊन आली आहे, जी भेट...

मोटोरोलाने लाँच केला ‘रेडी फॉर एनीथिंग’!

मोबाईल तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या मोटोरोलाने भारतात motorola edge50 Neo नुकताच सादर केला. मोटोरोलाच्या प्रीमियम एज स्मार्टफोन लाइनअपमध्ये सर्वात नवीन भर घालण्यात आली आहे, ज्यात शक्तिशाली वैशिष्ट्यांसह आकर्षक, कमीतकमी डिझाइनचा समावेश आहे. ज्यात 'रेडी फॉर एनीथिंग' ही टॅगलाइन समाविष्ट आहे. हे उपकरण जास्तीतजास्त...
error: Content is protected !!
Skip to content