Homeडेली पल्सकामगार नेते शशांक...

कामगार नेते शशांक राव भाजपात!

ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे चिरंजीव, कामगार नेते तसेच जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांनी काल १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जानेवारीत शशांक राव यांनी जनता दल युनायटेडच्या प्रदेशाध्यक्षपदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाने प्रेरित होऊन आणि त्यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे कामगारांचे प्रश्न सोडविण्यास अधिक सुलभता येईल. त्यामुळे मी योग्य निर्णय घेतला आहे, अशी भावना शशांक राव यांनी यावेळी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेऊन आपण भाजपात प्रवेश केला आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी खासदार पीयुष गोयल, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाळ शेट्टी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content