Homeब्लॅक अँड व्हाईटजाणून घ्या जगातली...

जाणून घ्या जगातली भारताची प्रतिमा!

काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड पण भीषण हल्ल्यानंतर सध्या भारत-पाकिस्तानात युद्धसदृष्य तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरील भारताची आजची प्रतिमा समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचल्यावर निश्चित अभिमान वाटेल! परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लिहिलेल्या The India Way, या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भारत मार्ग’, जरूर वाचायला हवा.

सी. राजा मोहन या पुस्तकाविषयी लिहितात की, “जागतिक स्तरावरील धोरणात्मक समस्या आणि भारतीय परराष्ट्रनीती समोरील आव्हाने यांचा विचार दुर्मिळ पद्धतीने महाभारताच्या भिंगातून केलेला आहे. अलिप्तवादापासून तर जागतिक संतुलनापर्यंतच्या अनेक विषयांवरील एस. जयशंकर यांचे निष्कर्ष नक्कीच भारतात आणि भारताबाहेर गंभीर स्वारस्याचे विषय बनतील.”

ऑपरेशन गंगा आठवते का आपल्याला? आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घ्यायचं आहे का? गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेला युक्रेन-रशिया संघर्ष, त्याआधी कोरोनाचा कहर आणि त्यापूर्वीचे अफगाणिस्तानमधून अमेरिकेची लष्करी माघार आणि तालिबानचे पुनरागमन अशा भयंकर काळात जगभर अनेक महासत्ता हादरून गेल्या. अनेक देशांचे आर्थिकदृष्ट्या वाटोळे झाले. त्यात आपले शेजारी श्रीलंका आणि पाकिस्तान तर ताजे उदाहरण! अशा काळात भारत मात्र जागतिक पातळीवर उगवत्या सूर्यासारखा तळपत होता. युक्रेन युद्धक्षेत्रातून विद्यार्थ्यांची भारताने केलेली सुटका ही सामान्य गोष्ट नव्हती! कित्येक पाकिस्तानी विद्यार्थी या काळात हातात तिरंगा घेऊन स्वतःला भारतीय म्हणून स्वतःचा जीव वाचवताना पाहायला मिळाले. ही गोष्ट केवळ एक उदाहरण!

प्रचंड उलथापालथ घडत असताना, युरोपियन देशात अनेक पंतप्रधान स्वतःहून राजीनामे देत आहेत. अशा काळात जगाच्या भारताकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत. जगाला नियंत्रित करू पाहणाऱ्या देशांना भारताने ठणकावले आहे. आमच्या सोयीने आम्ही परराष्ट्र धोरण ठरवणार! रशियाकडून तेलखरेदी केल्यास बहिष्काराची भाषा करणारे देश भारताचे काहीही बिघडवू शकले नाहीत. कधीकाळी भारतीय नागरिकांना पाकिस्तान एक मोठी समस्या वाटायचं. जगातील कोणता देश भारताकडून बोलेन का? याची काळजी असायची. काश्मीर, आसाम, मेघालय, खलिस्तान, नक्षलवाद असा विद्रोह होता. पाकिस्तानातून याला रसद मिळायची! आज पाकिस्तान स्वतः त्या गोष्टीला तोंड देत आहे. बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट, सिंध या भागात पाकिस्तानी आर्मीविरुद्ध प्रचंड उद्रेक होत आहे. तालिबान पाकिस्तानचे तुकडे करू इच्छित आहे. अफगाणिस्तान सीमेवर तालिबानसमर्थित पाकिस्तानी सैन्याचा संहार चालू आहे.

या सर्व गोष्टींना जे मूर्त स्वरूप देतात त्याच परराष्ट्रमंत्र्याने हे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले, माहितीने भरलेले हे पुस्तक!

काही प्रतिक्रिया

२. ‘द इंडिया वे’ हे पुस्तक म्हणजे जागतिक पातळीवरील भारताच्या आचरणाचे मूलस्रोत आणि अभूतपूर्व जागतिक परिस्थितीतील भारताच्या परराष्ट्र निधीच्या विकासाचे विचारपूर्वक केलेले चिंतन आहे. जगाच्या वाढत्या अस्थिर परिस्थितीत भारताला उपलब्ध असलेल्या पर्यायांची छाननी करण्यासाठी जयशंकर यांची योग्यता आणि अधिकार वादातीतच आहे.”
हर्ष व्ही पंत (हिंदुस्तान टाइम्स)

३. “कोणत्याही परराष्ट्र मंत्र्याला कार्यरत असताना परराष्ट्र धोरणावर पुस्तक लिहिण्यासाठी वेळ आणि इच्छा असल्याचे अभावानेच आढळून येते; पण राजनीतीत मुरलेला डॉ. एस. जयशंकरसारखा विद्वान जेव्हा सूत्रे हातात घेतो, तेव्हा सखोल विचारमंथनातून एखादे विस्तृत पुस्तक समोर येणे स्वाभाविकच! ‘द इंडिया वे’ हे एका डोळस निरीक्षकाचे आत्मनिवेदनही आहे आणि भारत ऐतिहासिक बदलांशी कशाप्रकारे जुळवून घेत आहे हे जगाला सांगण्याचे साधनही आहे. हे पुस्तक एका महत्वाकांक्षी देशाचे भवितव्य काय आहे याविषयी बरेच शिकवते. हे व्यावहारिक राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचे प्रखर आवाहन आहे.”

श्रीराम चौलिया (एशियन एज)

भारत मार्ग

लेखक: एस. जयशंकर

मराठी अनुवाद: सरिता आठवले

मूल्य: ३०० / पृष्ठे- २६२

सवलत मूल्य: २७० ₹, टपालखर्च- ५० ₹., एकूण: ३२० ₹

भारत

संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

Continue reading

अशी आहे रा. स्व. संघाची शतकी वाटचाल

संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले प्रकरण संघ कार्याचा प्रारंभ: विजयादशमी 25 सप्टेंबर 1925 नागपूर, हे असून शेवटचे प्रकरण क्रमांक ७०:...

.. आणि दिवाळी अंकाबाबत झालेली चर्चा फक्त चर्चाच राहिली!

परवा ८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता मोबाईल वाजला. दचकून जागा झालो आणि फोनवरचे बोलणे ऐकल्यावर कानावर विश्वासच बसला नाही. माझा परममित्र आणि ग्रंथ संवाद डिजिटल साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक जितेंद्र जैन तथा पप्पू याचे निधन झाले होते. दोनच दिवसांपूर्वी माझे...

वाचनीय, चिंतनीय व संग्राह्य असे ‘मृत्युंजय भारत’!

'मृत्युंजय भारत' या पुस्तकाचा  प्रकाशन सोहळा पुण्यात नुकताच प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला.‌ हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह, सुरेश जोशी उपाख्य 'भैयाजी' जोशी यांनी विविध प्रसंगी दिलेल्या ११ व्याख्यानांचे संकलन आहे. व्याख्यानांचे विषय- १) राष्ट्रीय...
Skip to content