Friday, October 18, 2024
Homeडेली पल्सकसे शोधाल आपले...

कसे शोधाल आपले मतदारयादीतले नाव?

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या तसेच महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख जवळ आली असताना मतदारांना त्यांचे मतदारयादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने ॲप्स आणि पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. VOTERS’ SERVICES PORTAL (eci.gov.in) या लिंकवर जाऊन अथवा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन मतदाराला आपले मतदान केंद्र, यादी क्रमांक शोधता येणार आहे.

याखेरीज मतदार स्वत:बद्दलची संपूर्ण माहिती ऑनलाईन भरूनही आपले मतदान केंद्र शोधू शकतात. तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकाद्वारेही तुमचे मतदान केंद्र आणि यादी क्रमांक शोधू शकता. व्होटर हेल्पींग ॲपद्वारेही तुम्ही मतदान केंद्र आणि यादी भागविषयी माहिती मिळवू शकता.

व्होटर आयडीव्यतिरिक्त इतर १२ ओळखपत्रे वैध

मतदारांनी मतदानाच्या दिवशी म्हणजे २० मे रोजी आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळखपत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, विशिष्ठ दिव्यांगांचे ओळखपत्र, केंद्र सरकार/राज्य सरकार/  सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, पासपोर्ट, बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्ड, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र मतदाना दिवशी ओळख पटविण्यासाठी वापरता येणार आहे.

जाणून घ्या तुमच्या मतदारसंघातील उमेदवाराबाबत

मतदार भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची माहिती जाणून घेऊ शकतात. Election Commission of India (eci.gov.in) या लिंकवर तुम्हाला उमेदवाराबाबत माहिती मिळेल अथवा ‘नो युवर कॅन्डीडेट’ (know your candidate) या ॲपवर माहिती मिळेल.

मतदार

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी

जिल्ह्यातील सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवर कार्यरत कर्मचारी, अधिकारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी आहे. सुट्टी नसल्यास दोन तासांची सवलत देणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. सुट्टी अथवा सवलत न दिल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली आहे.

उन्हाळ्यापासून बचावासाठी उपाययोजना

मतदारांना मतदान सहजतेने करता यावे यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, शौचालये, एकाच ठिकाणी अनेक केंद्रे असल्यास मतदान चिठ्ठीवर विविध रंगांचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून मतदारांना मतदान करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष रांग असणार आहे. अंध दिव्यांगांसाठी ईव्हीएम मशीनसाठी ब्रेल लिपी आणि वरिष्ठ नागरिकांना व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कुठे संपर्क साधाल?

मतदार सामान्य चौकशीसाठी १९५० क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेच, आपल्या क्षेत्रातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्यामार्फतही आपण मतदानासंदर्भात असलेल्या समस्यांबाबत माहिती घेऊ शकता. सक्षम ॲप दिव्यांग उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांबाबत आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे आढल्यास सि-व्हीजील ॲपवर (C vigil App) तक्रारी दाखल करता येऊ शकतात.

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content