Homeएनसर्कलआपत्कालीन परिस्थितीसाठी पंजाब...

आपत्कालीन परिस्थितीसाठी पंजाब पोलिसांना ‘किया’चे कॅरन्स!

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२४मध्ये परपझ बिल्ट वेहिलक्स म्हणून कॅरन प्रदर्शित केल्यानंतर, किया इंडियाने पंजाब पोलिसांना विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या ७१ कॅरन्स सुपूर्द केल्याचे जाहीर केले आहे. या परपझ बिल्ट वेहिकल्स (पीबीव्ही) आपत्कालीन परिस्थितीत लोकांच्या मदतीसाठी इमर्जन्सी रिस्पॉन्स वेहिकल्स म्हणून वापरण्यात येतील. पीबीव्ही सेगमेन्टमध्ये पदार्पण करून किया आता भारतातील काही विशेष संस्थांच्या विविध प्रकारच्या वाहनांच्या गरजा पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून काम करणार आहे. आधुनिक टेक्नॉलॉजी, कनेक्टेड फीचर्स, मोठा व्हीलबेझ आणि तिसऱ्या पंक्तीत उत्तम कम्फर्ट देणाऱ्या किया कॅरन्स पंजाब पोलिसांच्या वाहनाची पहिली पसंती बनली आहे.

किया इंडियाचे चीफ सेल्स अँड बिझनेस ऑफिसर म्युंग-सिक सोहन म्हणाले की, परपझ-बेझ्ड वेहिकल्स (पीबीव्ही) गतीशील भविष्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यात गतीच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी व्यापक कस्टमायझेशन करण्याची शक्यता ऑफर करण्यात येते. पंजाब पोलिसांशी सहकार्य करून त्यांना पीबीव्ही म्हणून तंत्रज्ञानाने प्रगत अशा कॅरन्स सुपूर्द करण्यात किया अभिमान अनुभवते आहे. या कॅरन्स खास करून लांबच्या प्रवासासाठी उत्कृष्ट आणि सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करतात. यातील प्रशस्त इन्टिरियर आणि आरामदायक हेडरेस्ट या गाडीला गतीचा आदर्श पर्याय बनवतात.अशा प्रकारची धोरणात्मक भागीदारी करून आम्ही कॅरन्ससारख्या समस्त परिवाराला सामावणाऱ्या गाडीचे आकर्षण अशा सर्व संस्थांपर्यंत पोहोचवू इच्छित आहोत, ज्यांना ७-सीटर गाडीची आवश्यकता आहे.

या कस्टमाइझ्ड कॅरेन्समध्ये आहे ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह एक स्मार्टस्ट्रीम १.५ पेट्रोल इंजिन. या पीबीव्हीमध्ये कस्टम हाय-इंटेन्सिटी स्ट्रोब लाइट्स, पीए सिस्टम्स आणि डायल ११२ – इमर्जन्सी रिस्पॉन्स वेहिकल डीकॅल्सचा समावेश आहे. हे अतिरिक्त जोडलेले उपकरण चालवण्यासाठी त्यात एक जास्त क्षमता असलेली ६० एएचची बॅटरी आहे. कॅरन्सचा व्हीलबेझ या गाडीच्या आणि त्यावरील सेगमेन्टमध्ये सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे पोलिस खात्यांसाठी स्वाभाविकपणे ही सुयोग्य पसंती बनू शकते. तिच्या उपयोगितेविषयी सांगायचे झाल्यास, या खास बनवलेल्या कॅरन्समध्ये दुसरी रांग ६०:४० तर तिसरी रांग ५५:५० अशी विभागली आहे, प्रत्येक रांगेला अॅडजस्ट होऊ शकणारे हेडरेस्ट आहेत, एक १२व्हीचे पॉवर सॉकेट आहे आणि ५ यूएसबी सी-टाइप पोर्ट्स आहेत, ज्यामुळे पंजाब पोलिस अधिकाऱ्यांसाठी ही गाडी अत्यंत सोयीची आहे. मानक कॅरन्स मॉडेलप्रमाणेच या पीबीव्हीमध्येदेखील हाय स्ट्रेन्थ स्टील स्ट्रक्चर आहे आणि ऑल व्हील डिस्क ब्रेक्स, एबीएस, आयडल स्टॉप अँड गो आणि टीपीएमएससारखी आधुनिक टेक्नॉलॉजी आहे.

कॅरन्सवर आधारित पोलीस कार आणि एक अॅम्ब्युलन्स २०२३मध्ये ऑटो एक्स्पोच्या १६व्या आवृत्तीत पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आली होती. त्याच वर्षी किया कॅरन्सने ‘इंडियन कार ऑफ द ईयर’ हा सन्मान मिळवला होता. पीबीव्हीची डिलिव्हरी करून कियाने अनुकूल सोल्यूशन्स प्रदान करून वाहनांच्या बदलत्या गरजा पुरवण्याप्रतीची आपली निष्ठा अधोरेखित केली आहे. या पीबीव्हीमध्ये गाड्यांमधील बदलाची पॅटर्न प्रतिबिंबित होते. आता वाहने ग्राहक आणि मार्केट या दोहोंच्या गरजेनुसार व्यापक प्रमाणात कस्टमाईझ करण्यात येतात. ज्यामुळे ग्राहक संतुष्टीची पातळी खूप उंचावली आहे. या डिलिव्हरीमधून २०३०पर्यंत ग्लोबल पीबीव्ही सेगमेन्टमध्ये आघाडी गाठण्याचे कियाचे व्हिजन दिसून येते.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content