Homeडेली पल्सकिया इंडियाने केली...

किया इंडियाने केली ४ लाखांपेक्षा जास्त कनेक्टेड कार्सची विक्री

नवीन तंत्रज्ञान संचालित गतीशीलतेचा अनुभव देण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या किया इंडियाने ४ लाखांपेक्षा अधिक कनेक्टेड कार्सची विक्री करून आणखी एक मैलाचा दगड ओलांडला आहे. किया इंडियाच्या एकंदर देशांतर्गत विक्रीमध्ये कनेक्टेड कार्स प्रकारांचे योगदान ४४%पेक्षा जास्त आहे, जो या उद्योगातील एका उत्तम केस-स्टडीचा नमुना आहे. किया इंडियाचे कनेक्टेड कार प्रकार ३०.९% सीएजीआर दराने वाढत आहेत. ही वाढ २०३२पर्यंत अंदाजित १८%च्या जागतिक दरापेक्षा जास्त आहे.

कियाच्या एकंदर कनेक्टेड कार विक्रीत ६५% योगदानासह सेल्टॉस आघाडीवर आहे. सेल्टॉस मॉडेल्ससाठीची ग्राहकांची प्राथमिकतादेखील कनेक्टेड कार सुविधांनी सुसज्ज प्रकारांकडे झुकत चालली आहे. यामध्ये विकलेल्या सर्व सेल्टॉस गाड्यांपैकी ५७% सामील आहेत. सेल्टॉसच्या पाठोपाठ कॅरन्समध्येदेखील हीच प्रवृत्ती दिसून येते. कॅरन्सच्या ३१% ग्राहकांनी कनेक्टेड कार प्रकार पसंत केला आहे. सध्या सोनेटच्या फक्त ७ प्रकारांमध्येच टेलीमॅटिक्स उपलब्ध असूनही या मॉडेल्सचे एकंदर विक्रीत २१% इतके लक्षणीय योगदान आहे. कियाने आपल्या वाहनांमध्ये प्रगत कनेक्टेड कार कार्यक्षमता लागू करून निरंतर नेतृत्त्व केले आहे.

किया इंडियाचे चीफ सेल्स अँड बिझनेस ऑफिसर म्युंग-सिक सोन म्हणाले की, आम्ही डिझाईन आणि तंत्रज्ञानातील उत्तमतेच्या बाबतीत मार्केटमध्ये आमच्या ब्रॅंडचे वेगळेपण जपले आहे. आजच्या अति-कनेक्टेड जगात ग्राहकांची अपेक्षा असते की, त्यांची कार त्यांच्या जीवनशैलीला अनुरूप असावी. त्यामुळे तंत्रज्ञानसक्षम गाड्यांची मागणी वाढली आहे. आमच्या नव्या जमान्याच्या ग्राहकांना सुरक्षित, अधिक कनेक्टेड आणि आनंददायक ड्रायव्हिंगचा अनुभव मिळावा यासाठी आम्ही निरंतर अधिकाधिक कनेक्टेड कार फीचर्स दाखल करत राहू.

ग्राहकांना आवडणाऱ्या काही अत्यंत लोकप्रिय फीचर्समध्ये हिंग्लिश कमांड, रिमोट विंडो नियंत्रण, रिमोट इंजिन आणि एसी स्टार्ट, व्हॅले मोड आदींचा समावेश आहे.

१. हिंग्लिश कमांड: वापरकर्ते आता ‘सनरूफ खोलो’सारखे हिंग्लिश कमांड देऊन कारची फीचर्स वापरू शकतात, जी खूप मोठी सोय आहे.

२. रिमोट विंडो नियंत्रण: हे फीचर वापरकर्त्याला दुरूनच आपल्या कारच्या खिडक्यांचे संचालन करण्यास सक्षम करते.

३. रिमोट इंजिन आणि एसी स्टार्ट: हे फीचर कार तयार ठेवते आणि गार / उबदार ठेवते त्यामुळे कारमध्ये बसले की लगेच आरामशीर वातावरण मिळते.

४. व्हॅले मोड: हे फीचर तुमचे AVNT अॅक्सेस करण्यापासून प्रतिबंधित करते आणि तुमचे खाजगीपण जपते.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content