Homeडेली पल्सकिया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस...

किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाखांत लॉन्च

 किया इंडिया या मास-प्रीमियम ऑटोमेकरने ग्राहकांसाठी त्‍यांची बिग, बोल्‍ड फॅमिली वेईकल नवीन किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाख रूपयांच्‍या आकर्षक सुरूवातीच्‍या किंमतीमध्‍ये लाँच केली आहे. आधुनिक, मोठ्या कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही प्रीमियम वेईकल एमपीव्‍ही व एसयूव्‍हीमधील तफावत दूर करते. आकर्षक एक्‍स्‍टीरिअर, एैसपैस इंटीरिअर आणि प्रगत वैशिष्‍ट्ये असलेली कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस आरामदायीपणा, वैविध्‍यता आणि स्‍टाइलचा शोध घेत असलेल्‍या आधुनिक काळातील कुटुंबांच्‍या गरजांची पूर्तता करते.  

स्‍टाइल, जी लक्ष वेधून घेते

एक्‍स्‍टीरिअर डिझाइनमधून कियाचे ‘ऑपोझिट्स युनायटेड’ तत्त्व दिसून येते, ज्‍यामध्‍ये प्रबळ उपस्थितीसह आधुनिक व भावी लुकचे संयोजन आहे. किया डिजिटल टायगर फेस, आइस क्‍यूब एमएफआर एलईडी हेडलॅम्‍प्‍ससह एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि स्‍टारमॅप एलईडी कनेक्‍टेड टेललॅम्‍प्‍स यांसारखे घटक विशिष्‍ट व्हिज्‍युअल ओळख निर्माण करतात. आर१७-४३.६६ सेमी (१७ इंच) क्रिस्‍टल-कट ड्युअल-टोन अलॉई व्‍हील्‍स, टिकाऊ फ्रण्‍ट व रिअर स्किड प्‍लेट्ससह सॅटिन क्रोम फिनिश, मेटल-पेंटेड साइड डोअर गार्निश इन्‍सर्ट्स आणि नवीन आयव्‍हरी सिल्व्‍हर ग्‍लॉस बॉडी कलर या वेईकलच्‍या रस्‍त्‍यावरील लक्षवेधकतेमध्‍ये अधिक भर करतात, ज्‍यामुळे वेईकलचा प्रीमियम दर्जा अधिक वाढतो.

आरामदायीपणासाठी डिझाइन, उत्‍साहवर्धक प्रवासासाठी निर्मिती

कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसच्‍या इंटीरिअरमध्‍ये दैनंदिन व्‍यावहारिकतेसह आधुनिक लक्‍झरी आणि विचारशील डिझाइनचे संयोजन आहे, ज्‍यामधून एकत्र प्रवास करायला आवडणाऱ्या कुटुंबांना आरामदायी व उत्‍साहवर्धक प्रवासाचा आनंद मिळतो. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस विविध ड्रायव्हिंग गरजांची पूर्तता करण्‍यासाठी स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.५ आणि स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.५ टूर्बो-जीडीआय पेट्रोल इंजिन्‍स आणि १.५ लिटर सीआरडीआय व्‍हीजीटी डिझेल इंजिन या तीन शक्तिशाली पॉवरट्रेन पर्यायांसह येते. पेट्रोल टर्बो आणि डिझेल इंजिन्‍स ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन पर्यायांसह कियाच्‍या पहिल्‍याच स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.५ टी-जीडीआयसह ६एमटी कन्फिग्‍युरेशनमध्‍ये येतात. 

कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस सात व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये येते- एचटीई, एचटीई (ओ), एचटीके, एचटीके+, एचटीके+ (ओ), एचटीएक्‍स आणि एचटीएक्‍स+, ज्‍यामुळे ग्राहकांना व्‍यापक श्रेणी मिळते. ही कार आयव्‍हरी सिल्‍व्‍हर ग्‍लॉस, प्‍युटर ऑलिव्‍ह, इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यू, ग्‍लेशियर व्‍हाइट पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, स्‍पार्कलिंग सिल्‍व्‍हर, अरोरा ब्‍लॅक पर्ल आणि क्‍लीअर व्‍हाइट या आठ आकर्षक रंगांमध्‍ये देखील उपलब्‍ध आहे.

किया इंडियाचे चीफ सेल्‍स ऑफिसर जून्‍सू चो म्‍हणाले की, आमच्‍या धोरणामध्‍ये नाविन्‍यतेला निरंतर प्राधान्‍य दिले जाते, ज्‍याला अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि विशिष्‍ट डिझाइनचे पाठबळ आहे. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसचे लाँच आमच्‍या प्रवासामधील मोठी उपलब्धी आहे, ज्‍यामधून प्रगतीशील, प्रीमियम व उद्देश-केंद्रित दृष्टिकोनाप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. आम्‍हाला माहित आहे की, ग्राहकांच्‍या अपेक्षा बदलत आहेत आणि कॅरेन्‍स क्‍लॅव्हिससह आम्‍ही गतीशीलतेपेक्षा अधिक सुविधा देत आहोत. ही वेईकल सर्वोत्तम अनुभव देते, तसेच दैनंदिन प्रवासाला अधिक उत्‍साहवर्धक करते. आम्‍ही प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करत असताना स्‍मार्ट, डिझाइन-केंद्रित सोल्‍यूशन्‍स देण्‍यावर लक्ष केंद्रित करत आहोत, जे आधुनिक काळातील कुटुंबांना सक्षम करतात आणि प्रत्‍येक राइडमध्‍ये विश्‍वास देतात.

किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसमधील प्रमुख आरामदायी वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:

l  तिसऱ्या व दुसऱ्या सीटमध्‍ये एैसपैस जागा, तसेच ६- व ७-सीटर पर्यायांमध्‍ये स्थिर आरामदायीपणासाठी स्‍लायडिंग, रिक्‍लायनिंग आणि वन-टच ईजी इलेक्ट्रिक टम्‍बल. 

l  प्रभावी उपलब्‍धता आणि सानुकूल स्‍पेस अॅडजस्‍टमेंटसाठी सेगमेंट-फर्स्‍ट वॉक-इन-लेव्‍हर (बॉस मोड). 

l  विनासायास इन्‍फोटेन्‍मेंट आणि ड्रायव्हिंग इंटरफेससाठी बेस्‍ट-इन-सेगमेंट ६७.६२ सेमी (२६.६२ इंच) ड्युअल पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेल.

l  केबिनमधील वातावरण कस्‍टमाइज करण्‍यासाठी ६४-कलर अॅम्बियण्‍ट लायटिंग.

l  सर्वत्र समप्रमाणात शुद्ध हवेच्‍या प्रसरणासाठी सीट-माऊंटेड स्‍मार्ट प्‍युअर एअर प्‍युरिफायरसह एक्‍यूआय डिस्‍प्‍ले आणि रूफ-माऊंटेड डिफ्यूज एअर व्‍हेंट्स.

l  ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ व्‍यापक दृश्‍यांसह केबिनमध्‍ये भरपूर प्रकाश देते.

l  पुढील बाजूस हवेशीर सीट्स आणि अधिक आरामदायीपणासाठी ४-वे पॉवर्ड ड्रायव्‍हर सीट.

l  बोस प्रीमियम साऊंड सिस्‍टमसह ८ स्‍पीकर्स प्रत्‍येक ड्राइव्‍हदरम्‍यान सुस्‍पष्‍ट व विशाल ऑडिओ देतात.

अतिरिक्‍त सुरक्षिता वैशिष्‍ट्ये-

किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस अडवान्‍स्‍ड ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स सिस्‍टम्‍स (एडीएएस) च्‍या लेव्‍हल २ सह सुसज्‍ज आहे, ज्‍यामध्‍ये २० ऑटोनॉमस सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत, जसे:

l  स्‍मार्ट क्रूझ कंट्रोल (एससीसी) सह स्‍टॉप अँड गो

l  फ्रण्‍ट कोलिजन-अव्‍हॉयडण्‍स असिस्‍ट – कार, पादचारी, सायकलिस्‍ट

l  फ्रण्‍ट-कोलिजन अव्‍हॉयडण्‍स असिस्‍ट – डायरेक्‍ट ऑनकमिंग

l  लेन कीपिंग असिस्‍ट

l  ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट कॉलिजन वॉर्निंग

l  क्‍लस्‍टरमध्‍ये ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर

l  रिअर क्रॉस ट्रॅफिक कॉलिजन अव्‍हॉयडण्‍स असिस्‍ट

तसेच रॉबस्‍ट स्‍टॅण्‍डर्ड सेफ्टी पॅकेजचा भाग म्‍हणून या वेईकलमध्‍ये १८ प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत, जसे:

l  अधिक सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग्‍ज

l  इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल (ईएससी)

l  रिअर ऑक्‍यूपण्‍ट अलर्ट सिस्‍टम

l  एचएसी (हिल-स्‍टार्ट असिस्‍ट कंट्रोल), डीबीसी (डाऊनहिल ब्रेक कंट्रोल)

l  रिअर पार्किंग सेन्‍सर्स

l  हायलाइन टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content