Homeहेल्थ इज वेल्थकोविडच्या परिस्थितीवर लक्ष...

कोविडच्या परिस्थितीवर लक्ष ठेवा!

देशातली काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशात कोविडच्या रुग्ण संख्येत नुकतीच झालेली वाढ आणि  कोविड-19च्या जेएन.1 या नव्या स्वरूपाच्या विषाणूने ग्रस्त पहिला रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले असून, देशभरात कोविडच्या परिस्थितीबाबत दक्ष राहून सतत देखरेख ठेवण्यावर या पत्रात भर दिला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांमधील सातत्यपूर्ण आणि सहकार्य ठेवून केलेल्या कृतींमुळे, आपल्याला कोविडचा प्रादुर्भाव सातत्याने कमी ठेवण्यात यश मिळाले आहे. असं असलं तरी, कोविड-19 विषाणूचा प्रसार अद्याप सुरूच असून, या विषाणूचे वर्तन भारतीय हवामानाची परिस्थिती आणि इतर नेहमीच्या रोग-जनुकांच्या प्रसाराशी जुळवून घेणारे ठरले आहे, हे लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्यातील आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आपल्याला कोविड प्रतिबंधक गती कायम ठेवणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी या पत्रात अधोरेखित केले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी कोविड नियंत्रण आणि व्यवस्थापनविषयक महत्त्वाची धोरणे अधोरेखित केली, ती अशी:-

आगामी सण, उत्सवांचा काळ लक्षात घेता, राज्यांनी पुरेशा सार्वजनिक आरोग्यसुविधा आणि इतर आवश्यक व्यवस्था सज्ज  ठेवाव्यात, तसेच श्वसनसंस्थेशी निगडीत स्वच्छता सूचनांचे पालन करावे जेणेकरून या आजाराचे संक्रमण टाळता येऊ शकेल.

केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने सामायिक केल्याप्रमाणे कोविड-19साठी देखरेख ठेवण्याच्या सुधारित धोरणाची तपशीलवार आणि प्रभावी अंमलबजावणी तसेच  मार्गदर्शक तत्त्वांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्याचे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे.

रुग्णसंख्येचा वाढता कल लवकर ओळखण्यासाठी, राज्यांना एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्म पोर्टलसह, फ्लूसारखे आजार किंवा गंभीर स्वरूपाच्या श्वसन रोगावर (एसएआरआय-सारी) लक्ष ठेवण्यास आणि त्याचा वेळोवेळी अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोविड-19 चाचणीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पुरेशा प्रमाणात चाचण्या सुनिश्चित करण्याचा आणि आरटी-पीसीआर आणि त्यातील शिफारस करण्यात आलेला अँटीजेन चाचण्यांचा वाटा कायम ठेवण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.

आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी तसेच जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह  रुग्णांच्या रक्ताचे नमुने, भारतीय सार्स सीओव्ही-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (आयएनएसएसीओजी) प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे देशात नवीन स्वरूपाचा विषाणू आल्यास, त्याचा वेळेवर शोध घेता येईल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, सर्व सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सुविधांची तयारी आणि प्रतिसाद क्षमता यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या रंगीत तालमीत त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content