Homeमुंबई स्पेशलबनावट लस घेतलेल्या...

बनावट लस घेतलेल्या ३९० जणांना उद्या अधिकृत डोस!

मुंबईतल्या कांदिवली (पश्चिम)मध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलात खासगी स्तरावर बनावट लसीकरण होऊन फसवणूक झालेल्या नागरिकांना मुंबई महापालिकेकडून उद्या अधिकृत लस दिली जाणार आहे. त्यासाठी उद्या, शनिवारी कांदिवली (पश्चिम)मध्ये महावीर नगर परिसरातील ऍमिनिटी मार्केट महापालिका लसीकरण केंद्रावर सत्र आयोजित करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईत आढळलेल्या ९ बनावट लस प्रकरणातील आतापर्यंत शोधलेल्या नागरिकांची यादी पोलीसांकडून महापालिकेला प्राप्त झाली आहे. या नागरिकांना योग्यरित्या अधिकृत लस देण्यासाठी आवश्यक ती सर्व पडताळणी करुन कार्यवाही सुरू आहे.

कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलाने ३० मे २०२१ रोजी खासगीरित्या लसीकरण आयोजित केले होते. मात्र, सदर लसीकरण बनावट आणि अनधिकृत पद्धतीने झाल्याची बाब नंतर उघडकीस आली. त्याबाबत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी चौकशीदेखील सुरू केली. त्याचे धागेदोरे हाती लागल्यानंतर अशाच रितीने एकूण ९ बनावट व अनधिकृत लसीकरणाचे प्रकार घडल्याचे आणि त्यात अनेक नागरिकांना बनावट / अनधिकृत लस दिल्याची प्राथमिक माहिती उघड झाली.

या लाभार्थ्यांना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तर, काहींची कोविन पोर्टलवर नोंद केल्याचेदेखील निदर्शनास आले आहे. अनधिकृत आणि अनुचित पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्व गोष्टींची पोलिसांनी सखोल चौकशी केली आहे.

पोलीस तपासानुसार ज्या नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याचा संशय आहे, त्या नागरिकांची यादी पोलिसांनी महापालिकेकडे सोपविली आहे. कोविन संकेत स्थळावर भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे या नागरिकांची माहिती महापालिकेकडून पडताळण्यात येत आहे.

पडताळणीअंती आणि पोलीस तपासानुसार, खरी लस मिळालेल्या नागरिकांना विहित नियमानुसार कालावधी पूर्ण होताच (कोव्हॅक्सिन असल्यास २८ दिवसांनंतर / कोविशिल्ड असल्यास ८४ दिवसांनंतर) दुसरा डोस देण्यात येईल. ज्यांना बनावट लस देण्यात आली, त्यांना योग्य ती कार्यवाही करुन अधिकृत लस देण्यात येणार आहे.

बनावट आणि अनधिकृत पद्धतीने खासगी स्तरावर लसीकरण झालेल्या सर्व नागरिकांना न्याय्य व योग्य पद्धतीने अधिकृत लस देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आवश्यक तेथे राज्य आणि केंद्र सरकारकडूनदेखील मंजुरी घेण्यात येत आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content