Homeचिट चॅटशिवसेनेचे खासदार राहुल...

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक

शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे काल, रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 73 वर्षांच्या होत्या.

प्रकृती आस्वास्थ्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्या घरीच होत्या. मात्र, रविवारी सायंकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना चेंबूरच्या साई रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्या पश्चात अविनाश शेवाळे, नवीन शेवाळे आणि खासदार राहुल शेवाळे अशी 3 मुले, वर्षा अविनाश शेवाळे, माजी नगरसेविका वैशाली नवीन शेवाळे, माजी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे या 3 सुना आणि एकूण 6 नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता ट्रॉम्बे कोळीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव आज सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत शिवतीर्थ, 10-B/12, बीएआरसी गेट नंबर 6 समोर, मंडाळा कॉलनी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, 88, या राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता अंत्ययात्रा निघेल.  आणि दुपारी 12 वाजता ट्रॉम्बे कोळीवाडा येथील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जातील.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content