Homeडेली पल्सतब्बल 40 वर्षांनी...

तब्बल 40 वर्षांनी भारताचे दुसरे अंतराळवीर झेपावणार अवकाशात

अंतराळ क्षेत्रात वाटचालीत एक नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत सज्ज झाला असून, पुढच्या महिन्यात भारतीय अंतराळवीराचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम आयोजित होणार आहे. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांषू शुक्ला, ऍक्झियॉम स्पेसच्या एएक्स-4 मोहिमेचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. या अंतराळ मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एखादा भारतीय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देईल आणि राकेश शर्मा यांच्या 1984मधील सोवियत सोयुझ अंतराळयानातून झालेल्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेनंतर तब्बल चार दशकांपेक्षा जास्त काळानंतर पहिल्यांदाच भारतीय अंतराळवीर अंतराळात प्रवास करेल.

येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या भावी योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर केंद्रीय अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल ही माहिती दिली. या बैठकीत अंतराळ विभागाचे सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी पुढच्या काही महिन्यांमध्ये हाती घेण्यात येणाऱ्या मोहिमांबाबत सविस्तर माहिती देणारे सादरीकरण केले. या आधारावर डॉ. सिंह यांनी ही घोषणा केली.

ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची मोहीम मे 2025मध्ये पार पडणार आहे. भारतीय वायुसेनेतील पदकविजेते टेस्ट पायलट असलेले ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची इसरोच्या मानवी अंतराळउड्डाण कार्यक्रमात निवड झाली होती व भारताचे पहिले स्वदेशी मानवसहित ऑर्बिटल उड्डाण असणाऱ्या गगनयान मोहिमेसाठी विशेष पसंती मिळालेल्यांमध्ये त्यांची गणना होते. या Ax-4 मोहिमेतील त्यांच्या सहभागामुळे त्यांना महत्वपूर्ण असा अंतराळ उड्डाण प्रणाली, लॉंच प्रोटोकॉल, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेणे तसेच आणीबाणीच्या परिस्थितीतील मानसिक तयारी, या सर्व गोष्टींचा अनुभव मिळेल, जो भारताच्या अंतराळ मोहिमांसाठी उपयुक्त ठरेल. या बैठकीदरम्यान डॉ जितेंद्र सिंह यांना इसरोतील  जानेवारी 2025पासून घडत असलेल्या अनेक महत्त्वाच्या घटनांची माहिती देण्यात आली. आदित्य L1 सौर मोहीमेत  मिळालेली  माहिती प्रसिद्ध करणे, डॉकिंग व अन डॉकिंग तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक, भारतात विकसित केलेल्या उच्च क्षमतेच्या लिक्विड इंजिनची चाचणी व श्रीहरीकोटा इथून झालेल्या ऐतिहासिक 100व्या  प्रक्षेपणाच्या माहितीचा त्यात समावेश होता. राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा समारंभ असलेल्या कुंभमेळा 2025मध्ये उपग्रहावर आधारित देखरेख करण्यात इसरोने वठवलेली महत्त्वाची भूमिका व  भावी काळातील लॉन्च वेहिकल रिकव्हरी मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण असलेले विकास इंजिन पुन्हा सुरु करण्याचे यशस्वी प्रात्यक्षिक याबद्दलही यावेळी माहिती देण्यात आली.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content