Friday, November 8, 2024
Homeबॅक पेजपर्यटकांना आकर्षित करते...

पर्यटकांना आकर्षित करते भारतातली समृद्ध संस्कृती!

भारतात पर्यटन क्षेत्र वेगाने वृद्धींगत होत आहे. इतकेच नव्हे तर, देशातील आर्थिक वृद्धी व गुंतवणूक  संधींना पर्यटन उद्योगामुळे प्रचंड चालना मिळत आहे. भारतातील समृद्ध संस्कृती, इतिहास आणि  नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. सरकारी उपक्रम, तंत्रज्ञानातील प्रगती  आणि ग्राहकांच्या आवडीनिवडींमधील बदल यामुळे पर्यटन उद्योगक्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडून येत  असून, त्यामुळे या उद्योगाकडे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे.

२०१९मध्ये प्रवास आणि पर्यटनावर १४० बिलियन डॉलर्स खर्च केले गेले होते. २०३० सालापर्यंत ही रक्कम ४०६ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. स्मार्ट शहरे विकसित करणे आणि वाहतुकीमध्ये  सुधारणा घडवून आणण्यासारख्या पर्यटनाच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये प्रगती घडवून आणण्याच्या  सरकारच्या प्रयत्नांमुळे या वाढीला चालना मिळत आहे.

टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे प्रॉडक्ट्स विभागाच्या प्रमुख शेली गंग सांगतात की, मूलभूत गरजांव्यतिरिक्त इतरत्र खर्च करण्यायोग्य उत्पन्नात होत असलेली वाढ आणि मध्यमवर्गीयांची वाढती लोकसंख्या यामुळे  प्रवास व फुरसतीच्या वेळेवर खर्च करणाऱ्या भारतीयांची संख्यादेखील वाढत आहे. अनुभव घेण्यासाठी  प्रवास करणाऱ्या मिलेनियल्सच्या वाढत्या लोकसंख्येमुळे या ट्रेंडला अजून जास्त चालना मिळत आहे.  भारतात एकूण पर्यटनापैकी ९९% देशांतर्गत पर्यटन आहे.

टाटा ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने नुकताच देशातील पहिला ‘टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंड’  आणला आणि गुंतवणूकदारांना भारतातील वेगाने वृद्धींगत होत असलेल्या प्रवास, पर्यटन व हॉस्पिटॅलिटी व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करवून दिली. हा फंड देशांतर्गत पर्यटनाशी संबंधित  आहे, ज्याची देशातील एकूण पर्यटनातील हिस्सेदारी ९९% आहे. परदेशात प्रवास करणाऱ्या तसेच  भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या त्यांच्या मानाने खूपच कमी आहे.

खूप मोठ्या लोकसंख्येची आर्थिक क्षमता वाढत असणे ही पर्यटन क्षेत्राच्या वृद्धीसाठी एक लक्षणीय संधी आहे. बजेटमध्ये सहज बसतील, भरपूर अनुभव मिळवून देतील अशी आरामदायी ठिकाणे, थेट  विमानसेवेची आणि शिथिल व्हिजा नियमांची सुविधा यांचा भारतीय प्रवासी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत  आहेत. भारतातील समृद्ध संस्कृती व परंपरा, ऐतिहासिक ठिकाणे आणि वैविध्यपूर्ण निसर्गरम्य दृश्ये यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक आकर्षित होतात. जादुई हिमालयापासून मनमोहक समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, डोळे दिपवून टाकणाऱ्या सणांपासून ते जगप्रसिद्ध स्मारकांपर्यंत अनेक वेगवेगळी आकर्षणे भारतात  आहेत. भारतातील विविधता भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करते, पर्यटन  उद्योगक्षेत्राच्या वृद्धी व स्थिरतेमध्ये योगदान देते, असे त्या म्हणाल्या.

भारतातील विमानचालन उद्योग ही नववी सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक बाजारपेठ आणि  जगभरातील सर्वाधिक वेगाने वृद्धींगत होत असलेली देशांतर्गत हवाई बाजारपेठ आहे. मूलभूत  गरजांव्यतिरिक्त इतर गोष्टींवर खर्च करण्यायोग्य उत्पन्नात झालेली वाढ आणि हवाई प्रवासाचा  परवडण्याजोगा खर्च यामुळे या उद्योगक्षेत्रातील मागणीला चालना मिळत आहे. छोट्या शहरांपर्यंत नवीन मार्गांचा समावेश करून हे उद्योगक्षेत्र आपली पोहोच वाढवत आहे. हवाईमार्गाने कनेक्टिविटीमध्ये  सुधारणा करत आहे, असेही गंग म्हणाल्या.

पर्यटन क्षेत्रदेखील तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आहे. एआय-चलित ग्राहक सेवा, ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्म्स आणि व्हर्च्युअल रियॅलिटी टूर यामुळे प्रवासाचा अनुभव वृद्धींगत होत आहे आणि टेकसॅव्ही लोक पर्यटनाकडे आकर्षित होत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content