Homeएनसर्कलखाद्यतेलातील आत्मनिर्भरतेसाठी भारताची...

खाद्यतेलातील आत्मनिर्भरतेसाठी भारताची पाम मेगा लागवड मोहीम!

वर्ष 2025-26 पर्यंत पामच्या लागवडीखालील क्षेत्र 10 लाख हेक्टर पर्यंत वाढवण्याच्या आणि कच्च्या पाम तेलाचे उत्पादन 11.20 लाख  टनांपर्यंत नेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – पामतेल सुरु केले. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी 25 जुलै 2023 पासून पामतेल उत्पादकांसोबत पामच्या मेगा लागवड योजनेला आरंभ केला आहे. पतंजली फूड प्रा. लि, गोदरेज एग्रोवेट आणि 3F या तीन प्रमुख पामतेल प्रक्रिया कंपन्या लागवडीच्या विक्रमी क्षेत्र विस्तारासाठी आपापल्या राज्यातील शेतकऱ्यांसोबत यात सहभागी होत आहेत आणि प्रोत्साहन देत आहेत.

खाद्यतेलाच्या उत्पादनातील वाढीसोबतच या योजनेने खाद्यतेलाची आयात कमी करुन एकप्रकारे भारताचा आत्मनिर्भर भारताकडे होणारा प्रवास सुकर केला.

मेगा लागवड मोहीम 25 जुलै 2023 रोजी सुरू झाली आणि 12 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहील. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, गोवा, आसाम, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल ही प्रमुख पाम तेल उत्पादक राज्ये या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content