Homeमाय व्हॉईसविश्वगुरूचे वैभव पुन्हा...

विश्वगुरूचे वैभव पुन्हा मिळवण्याकडे भारताची वाटचाल!

विश्वगुरू म्हणून आपले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी भारत आपला मार्ग आखत आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी तरुण नेत्यांना भावी पिढ्यांसाठी असा एक मार्ग तयार करण्याचे आवाहन केले, जिथे आशा आकांक्षा आणि मनोधैर्य उंचावेल आणि त्याची प्रचिती आपल्या समृद्ध संस्कृतीची जपणूक करणाऱ्या समृद्ध भारतात दिसून येईल. आपण 2047च्या दिशेने वाटचाल करत असताना, स्वतः बद्दल विश्वास बाळगूया, कार्याला सुरुवात करूया, सहयोग वाढवूया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदल घडवणारे बनण्याची आकांक्षा बाळगूया, यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.

जमशेदपूरमधील  एक्सएलआरआय–झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंटला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्याला संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक आणि कृती दोन्हींमधून आर्थिक राष्ट्रवाद आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करून तरुणांमध्ये “स्वदेश”ची भावना पुन्हा रुजवण्याची अत्यावश्यक गरज असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी उपराष्ट्रपतींनी स्वदेशचे अनेक फायदे स्पष्ट करून सांगितले यामध्ये परकीय चलनाचा साठा राखून ठेवण्यापासून ते उद्योजकतेला चालना देणे आणि रोजगाराच्या संधींना चालना देण्यापर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश होता. अपयशाच्या भीतीपासून सावधगिरी बाळगत स्वतःला विकासाविरोधी आणि वृद्धीविरोधी म्हणून घेणे अतिशय नुकसानकारक असल्याचे सांगत उपराष्ट्रपती यांनी नमूद केले की, भीतीपोटी एखाद्या कल्पनेचा पाठपुरावा करण्यापासून स्वतःला दूर ठेवणे हे केवळ स्वत:वरच अन्याय केल्यासारखे होत नाही तर यामुळे मोठ्या प्रमाणावर मानवतेवरही अन्याय होतो.

हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे की यशाची मोजणी ही केवळ बोजड पुस्तके वाचून किंवा उत्कृष्टतेचे शेरे घेऊन होते असे नाही तर सतत नवनवीन शिकण्याची उत्कटता जोपासणे आणि समोर येणाऱ्या आव्हानांवर आपण कशा प्रकारे  मात करू शकतो यामधूनही यशाची मोजणी होत असते असेही उपराष्ट्रपतीनी सांगितले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content