Homeचिट चॅटभारताची पहिली ‘गगनयान’...

भारताची पहिली ‘गगनयान’ मोहीम 2024च्या अखेरीस!

भारताची ‘गगनयान’ ही पहिली मानवी अंतराळ मोहीम (एच1) 2024च्या चौथ्या तिमाहीदरम्यान करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), अणुउर्जा आणि अंतराळ मंत्री जितेंद्र सिंह यांनी काल लोकसभेत  दिली.

या मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेला असलेले सर्वोच्च महत्त्व विचारात घेऊन उड्डाणाच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये क्रू एस्केप प्रणाली आणि पॅराशूट आधारित वेग कमी करण्याची प्रणाली यांच्या कामगिरीची चाचपणी करण्यासाठी मुख्य ‘जी1’ मोहिमेपूर्वी दोन चाचणी वाहन मोहिमा राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मानवरहित ‘जी1’ मोहिमेचे प्रक्षेपण 2023च्या शेवटच्या तिमाहीमध्ये करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापाठोपाठ ‘जी2’ या मानवरहित दुसऱ्या मोहिमेअंतर्गत 2024च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रक्षेपण करण्यात येईल आणि त्यानंतर ‘एच1’ ही मुख्य मानवी अंतराळ मोहीम 2024च्या चौथ्या तिमाहीमध्ये राबवणार असल्याची माहिती डॉ. सिंह यांनी एका लेखी उत्तरात दिली.

गगनयान

पहिला मानवरहित गगनयान कार्यक्रम म्हणजे ‘जी1’ मोहिमेचे मानव वापर करणार असलेल्या प्रक्षेपक वाहनाची, कक्षीय प्रवेशाच्या प्रणालीची, मोहीम व्यवस्थापन, दळणवळण प्रणाली आणि पूर्वस्थितीत येणाऱ्या क्रियांची कामगिरी पडताळून पाहणे हे उद्दिष्ट आहे. या अंतराळयानामध्ये वाहक भार म्हणून एक मानवी प्रतिकृती पाठवण्यात येईल, असे ते म्हणाले.

या मानवी अंतराळ मोहिमेत सहभागी होण्यासाठी अंतराळवीरांची निवड करण्यात आली असून सध्या ते बेंगळूरु येथे या मोहिमेचे विशेष प्रशिक्षण घेत आहेत. अंतराळवीर प्रशिक्षणाचे पहिले सत्र पूर्ण झाले असून त्यामध्ये त्यांना सैद्धांतिक विषय आधारित, अंतराळ वैद्यकशास्त्र, प्रक्षेपक वाहने, अंतराळयान प्रणाली आणि जमिनीवरील पाठबळ पुरवणाऱ्या पायाभूत सुविधा, नियमित शारीरिक तंदुरुस्ती सत्रे, एरोमेडिकल प्रशिक्षण आणि उड्डाणाचा सराव अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सर्वांशी संबंधित मूल्यमापन आणि कामगिरी तपासून पाहणारे उपक्रमदेखील पूर्ण करण्यात आले आहेत. अंतराळवीर प्रशिक्षणाचे दुसरे सत्र सध्या प्रगतीपथावर आहे, असेही त्यांनी सांगितले.   

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content