Homeचिट चॅटविशेष ऑलिम्पिकसाठी भारतीय...

विशेष ऑलिम्पिकसाठी भारतीय संघ बर्लिनला रवाना

198 खेळाडूंसह 280 सदस्यांचा समावेश असलेला भारतीय संघ 12 जून रोजी विशेष ऑलिम्पिक जागतिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर्मनीतील बर्लिन येथे रवाना झाला. प्रवासाला निघण्यापूर्वी 8 जून रोजी झालेल्या निरोप समारंभात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांना भेटण्याची संधी संघाला मिळाली.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांनी विशेष ऑलिम्पिकमधील भारतीय चमूच्या  सहभागासाठी 7.7 कोटी रुपये निधी मंजूर केला असून आजपर्यंतची स्पर्धेसाठी मंजूर केलेली सर्वाधिक रक्कम आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली येथे या जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी संघाचे पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिरही पार पडले होते. या जागतिक स्पर्धेत 190 देशांमधून 7000 हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.

17 ते 25 जून दरम्यान होणाऱ्या या भव्य स्पर्धेत 16 विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू पदकांसाठी लढताना पहायला मिळणार आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content